Crowds of devotees flock here at Adiyal | अड्याळ येथे उसळणार भाविकांची गर्दी
अड्याळ येथे उसळणार भाविकांची गर्दी

ठळक मुद्देकार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा : बुधवारी पालखी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, प्रसिध्द हनुमंत देवस्थान, गंगा माता मंदिर अशा विविध मंदिरात दरवर्षी येणाऱ्या कोजागिरीच्या दुसºया दिवशीपासून काकड आरती, सुंदरकांड, हरिपाठ तथा हरिकीर्तनाला गावातील आबालवृध्द मोठ्या संख्येने पहाटे पाच वाजतापासून मंदीरात हजेरी लावत आहेत. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंत अखंड असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. अड्याळ येथे होत असलेल्या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी होत आहे.
अड्याळ आणि परिसरातील असंख्य गावात आजही काकड आरतीची परंपरा कायम आहे. ही परंपरा सुरू राहण्यासाठी गावातील ज्येष्ठ माऊली भजनी मंडळ प्रयत्नशील आहेत. दरवर्षीप्रमाणे या वषी अड्याळ ग्रामवासीयांनी येणाºया कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने व वैकुंठवासी नारायण सीताराम भागवत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन बुधवारी गावातील प्रसिध्द विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केले आहे. गत महिनाभरापासून अड्याळ आणि परिसरातील गावातील मंदिरात पहाटेपासून काकड आरतीचा व टाळ मृदंगाचा तथा हरिनामाचा गजर दर दिवसाला होताना दिसतो आहे. यामुळे भाविक भक्तांची मांदियाळी सर्वच मंदिरात असल्याचे पाहायला मिळते. यामुळे गावात सर्वत्र भक्ती भावाचा सुगंध दरवळत आहे. येथिल प्रसिध्द विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने जो पालखी सोहळा होतो त्यात गावं आणि परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी रांग लावतात. यात अनेक भजनी मंडळ उत्साहात भाग घेतात.

Web Title: Crowds of devotees flock here at Adiyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.