शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

भंडाऱ्यात ७६० कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट; ३५८ कोटींचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:56 IST

Bhandara : ३३९.९४ कोटींचे कर्ज वितरण करून सहकारी बँक यंदाही आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगाम २०२५-२६ साठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख १० हजार ८० शेतकऱ्यांना एकूण ७६०.३३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ५८ हजार २१० शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत एकूण ३५८.६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्ज वितरणात यंदाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बाजी मारली आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ५६ हजार ४७४ शेतकऱ्यांना ३३९.९४ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. राष्ट्रीयीकृत बँकांना मागे टाकत जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदाही आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात बँक खातेदार शेतकऱ्यांची एकूण संख्या १,१०,०८० इतकी आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे खातेदार, राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार, ग्रामीण बँकांच्या व अन्य बँकांच्या खातेदारांचा समावेश आहे. सध्या स्थितीत खरीप हंगामासाठीचे पीक कर्जवाटप सुरळीत आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच कर्जवाटप होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यंदाचे बँकनिहाय कर्ज वाटपाचे उद्दिष्टयंदा १,१०,०८० खातेदार शेतकऱ्यांना एकूण ७६०.३३ कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. हे उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा सहकारी बँकांना ४८४.५८ कोटींचे, राष्ट्रीयीकृत बँकांना २४१.१२ कोटींचे, ग्रामीण बँकांना ३४.४३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

गत वर्षातील पीक कर्ज वितरणाची कामगिरीसन २०२४-२५ या वर्षात जिल्हा बँकांनी ७८,४२० शेतकऱ्यांना ४२१.२६ कोटींच्या पीक कर्जाचे वितरण केले होते. राष्ट्रीयकृत बँकांनी ९,२६१ शेतकऱ्यांना १०९.३२ कोटी रुपये, ग्रामीण बँकांनी ३,६२३ शेतकऱ्यांना ३६.६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले होते.

आतापर्यंत केलेले कर्जवाटपजिल्हा बँकेने ५६,७७४ शेतकरी सभासदांना ३३९.९४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी १,७३६ शेतकऱ्यांना १८.७१ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकांनी ४ हजार ९४३ शेतकऱ्यांना ३४.६३ लाख रुपयांचे उद्दिष्ट असूनही अद्याप एकही कर्ज वाटप केले नसल्याची माहिती आहे.

यंदा पीक कर्ज वितरण वाढणार काय ?खरीप हंगाम २०२४-२५ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ७८३.१४ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.

टॅग्स :bhandara-acभंडाराCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी