शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

करडी येथे आम्रवृक्षाची खुलेआम होत आहे कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:15 PM

करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देठेकेदाराचा प्रताप : तुमसर वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. करडी गोटाळी मैदानाजवळ विनापरवानगी आंब्याच्या झाडांची कत्तल करण्यात आली असून प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.फळांचे झाडे पशुपक्षी व मानवांसाठी मौल्यवान आहेत. त्यामुळे फळांचे झाड तोडण्यापुर्वी त्यांची रितसर वनविभागाकडून परवानगी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात लाकूड ठेकेदारांनी नियमांना बगल देत मनमर्जीने फळझाडांच्या कत्तली सुरु केल्या आहेत. शेतकरीही पर्यावरणाच्या ºहासाचा विचार न करता दुर्लक्ष करुन ठेकेदारांकडून घरपोच पैसे मिळत असल्याने सातबारा व अन्य कागदपत्रे सुपूर्द करीत आहेत. अधिकारी सुध्दा ठेकेदारांकडून मिळणाऱ्या लालसेपोटी खसºयाच्या ठिकाणी जातांना दिसत नाही. कार्यालयातूनच सर्व सोपस्कर पार पाडीत ठेकेदारांना गैरप्रकार करण्याची परवानगी देत आहेत.लाकूड कटाईच्या नियमानुसार झाडे कापण्यापूर्वी रितसर वनधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे गरजेचे असते. तसेच कापलेल्या झाडांच्या ठिकाणीच अन्य सोपस्कर पार पाडल्यानंतर वाहतुकीची परवानगी दिली जाते. तोपर्यंत ठेकेदारांना शेतातून लाकडे बाहेर काढण्यास मनाई आहे. परंतू करडी परिसरात बेकायदेशिरपणे झाडांच्या अवैध कत्तली व वाहतूक केल्या जात आहेत. आता तर आंबे लागलेल्या फळझाडांना सुध्दा ठेकेदारांनी सोडलेले नाही. करडी गोटाळी मैदानाजवळील आंब्याचे मोठे झाड ठेकेदाराने कोणत्याही परवानगी न घेता कटाई केली असल्याने प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.करडी परिसर ठेकेदारांसाठी नंदनवनकरडी परसर सध्या लाकूड ठेकेदारांचे नंदनवन ठरतांना दिसत आहे. या भागात बाहेरुन आलेले ठेकेदार कार्यरत आहेत. तुमसर वनविभागाच्या आशिर्वादाने सागवन व आडजातीचे झाडे परवानग्या न घेता तोडल्या जावून वाहतूक व साठवणूक गावाशेजारी केली जात आहे.परिसरात खडकी, पालोरा, बोरगाव, करडी, पांजरा, नवेगाव, मोहगाव, निलज आदी गावात मोठ्या प्रमाणात लाकूड ठेकेदारांनी वाहतुकीची परवानगी न घेता लाकडांची साठवणूक केली आहेत. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग