शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

महागाई व जलसंकटाने घरकुल लाभार्थ्यांवर ओढावले संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:10 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.

ठळक मुद्देसिमेंट, वाळूचे दर गगणाला : रोजगार मिळेना, संसार चालवणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुरते मेटाकुटीस आले आहेत.सिमेंटच्या अमर्याद दरवाढीमुळे विकास कामांसह वैयक्तीक घरे उभारणाऱ्या सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहेत. परिणामी भंडारा शहरासह जिल्ह्यातील बांधकाम उद्योग ठप्प होण्याचे संकट ओढवले आहे. वाढत्या सिमेंट दराला नियंत्रणात ठेवण्यात शासनही अपयशी ठरले आहे. बांधकामासाठी सिमेंट, लोखंड , वाळू , पाणी आदी अत्यावश्यक असून याचे दर नेहमीच अस्थिर राहतात. याचाच फायदा जिल्ह्यातील वाळूतस्करीला प्रोत्साहन मिळत आहे. मागील वर्षभरापासून वाळू मिळणे दुर्मिळ झाले असून वाळूच्या दरात देखील सातत्याने वाढ होते आहे. घर बांधकामासाठी मिळेल त्या दरात वाळूची खरेदी करणे ग्राहकांची समस्या बनली आहे. देशातील सिमेंट उत्पादकांच्या अमर्याद दरवाढीचा बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे.मार्च अखेर सिमेंटदरात वाढ होवून सिमेंटच्या एका बॅगची किंमत ५० किलोला ३५० ते ४०० रूपयांवर पोहचली आहे. स्टिलच्या किंमतीही ४१ ते ४४ रूपये प्रति किलो वर पोहचल्या आहेत. त्यातच वाळू मिळणे दुरापास्त झाल्याने घरबांधकाम करणे ही सर्व सामान्यांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे वाढत्या बांधकाम साहित्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात सिमेंटचा तुटवडाएखादे बांधकाम करताना बांधकाम कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यातच बांधकाम साहित्यासाठी ५० टक्यापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाते. बांधकाम साहित्य एजन्सीधारकही साहित्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतात. पण पैसे देऊनही बांधकाम साहित्यासाठी टोलवाटोलवी करतात. आॅडरप्रमाणे पैसे देऊनही बांधकामाच्या पुढील टप्प्यासाठी दर वाढणार असल्याने ग्राहकांना एजन्सीधारकांकडून सांगितले जाते. त्यामुळे संपूर्ण बांधकामासाठीच लागणाºया साहित्याची बुकिंग करण्यासाठी आगावू रक्कम घेतले जाते. परंतु दोन दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही वेळेत सिमेंट तसेच बांधकाम साहित्य मिळत नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी संकटात आहे.पाणीटंचाईचा जाणवतोय परिणामयावर्षी कमी झालेल्या पर्जन्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याने बांधकामास टाळाटाळ होत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील रोजगारावर होत आहे. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे तसेच पाणीटंचाईमुळे अनेक घरकुलांसह, अनेकांची बांधकामे रेंगाळली आहेत. .