विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करा
By Admin | Updated: February 11, 2016 00:56 IST2016-02-11T00:56:39+5:302016-02-11T00:56:39+5:30
विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांना शिक्षकांनी चालना द्यावयास पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये कला, कौशल्य निर्माण करून त्याचा सर्वांगिण विकास शिक्षकांनी करावयास पाहिजे.

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करा
स्नेहसंमेलन : भास्कर रक्षये यांचे प्रतिपादन
पवनी : विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांना शिक्षकांनी चालना द्यावयास पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये कला, कौशल्य निर्माण करून त्याचा सर्वांगिण विकास शिक्षकांनी करावयास पाहिजे. खाजगी शाळा व सरकारी शाळा यामध्ये सरकारी शाळा कधीही कमजोर नाहीत. चांगले गुणी शिक्षक मेहनत घेवून खाजगी शाळांपेक्षा आपला शैक्षणिक दर्जा उंचावू शकतात, असे प्रतिपादन प्रा. भास्कर रक्षये यांनी केले.
नगर परिषद लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्रेहसंमेनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालिकेचे उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून न.प. बांधकाम सभापती भास्कर उरकुडकर, विरोधी पक्षनेता धमेंद्र नंदरधने, सदस्या सुरेखा जनबंधू, पत्रकार संस्थाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी, डॉ. भागवत आकरे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश पचारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोहाड, उपाध्यक्षा पुष्पा बावनकर, सदस्य मनोज कोल्हे, अतुल कोहाट उपस्थित होते. शाळेचा दर्जा शिक्षकांनी वाढविला पाहिजे. तसेच चांगले विद्यार्थी घडविल्याचा प्रयत्न शिक्षकांनी भरावयास पाहिजे, असे प्रतिपादन उद्घाटक डॉ. विजय ठक्कर यांनी केले. अशोक पारधी यांनी शिक्षणाची नवी पद्धत शिक्षकांनी स्विकारून अध्यापन कार्य करावयास पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शिक्षकांनी भरावयास पाहिजे, असे मत व्यक्त केले. विरोधी पक्षनेता धमेंद्र नंदरधने, डॉ. भागवत आकरे, सुरेखा जनबंधू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तथा मुख्याध्यापक प्रकाश ढवळे यांनी केले. संचालन सहायक शिक्षक जयपाल नागोसे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षिका शिल्पा गजभिये यांनी केले.
यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाकरीता सहायक शिक्षक अनित चेटूले, जानबा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशोक खांदाडे, सुमन काटेखाये तथा सर्व सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)