शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट समिती निवड प्रक्रियेतून गदारोळ

By admin | Updated: November 15, 2014 01:19 IST

पाणलोट समिती निवड प्रक्रियेवरून मोहाडी खापा गावात वादळ निर्माण झाले आहे. दि.१२ ला आयोजित सभेत दोन गटात तणाव वाढल्याने निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

चुल्हाड (सिहोरा) : पाणलोट समिती निवड प्रक्रियेवरून मोहाडी खापा गावात वादळ निर्माण झाले आहे. दि.१२ ला आयोजित सभेत दोन गटात तणाव वाढल्याने निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या सभेत पोलिसांना पाचारण करण्यात आले असून पुढील निर्णय तुमसरच्या बीडीओ घेणार आहेत.गावातील शेती विषयक कामे करण्यासाठी शासनाने पाणलोट योजना आणली आहे. ग्रामसभेत निवड करण्यात आलेली पाणलोट समिती अंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीत विकास कामे केली जाणार आहे. याशिवाय समितीच्या सचिवांना मासिक मानधन दिले जाणार आहे. जवळपास या समितीला गावात विकास कामे करण्यासाठी २० लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. यामुळे गावा गावात समिती निवड प्रक्रिया अंगावर धावून जाणारी ठरत आहे. गेल्या महिना भरापासून मोहाडी खापा गावात पानलोट समिती निवड करण्याच्या मागणी वरून वाद सुरू आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. या योजनेत पैसा आहे. श्रमदान नाही. यामुळे समितीत स्थान प्राप्त करण्यासाठी गावात स्पर्धा सुरू झाली आहे. या समितीत राजकारण शिरल्याने निवड प्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. मोहाडी खापा गावात पानलोट समितीची निवड प्रक्रिया राबविण्यासाठी दि.१२ ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेत गावातील ५०० नागरिकांनी सहभाग घेतला आहे. सभेत मंडळ कृषी अधिकारी उईके, सहायक अधिकारी राऊत, अन्य दोन कर्मचारी या शिवाय सचिव नागदेवे व सरपंच विमला कानतोडे उपस्थित होते.निवड प्रक्रिया सुरू करताना आधी शासनाचे परिपत्रक निकष आणि नियम वाचून दाखविण्यात आले आहे. आधी समितीचे अध्यक्ष आणि १३ सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एका गटाने धनराज बुद्धे तर दुसऱ्या गटाने ओमप्रकाश शरणागत याचे नाव अध्यक्ष पदासाठी दिले. एका पदासाठी दोन गावे आल्याने सभेत गोंधळ उडाला. शासनाच्या परिपत्रकानुसार ही प्रक्रिया राबविणार असल्याची भूमिका कृषी अधिकाऱ्यांनी घेतली. या नियमांना झुगारत एका शिक्षकाने शासनाचे परिपत्रक हिसकावले. नियमात नसतानाही अध्यक्ष व सचिवाची निवड आजच करण्याची अट लावून धरली. सचिवाची निवड १० दिवसाच्या कालावधीत करण्याचे परिपत्रकात नमून आहे. या निवड प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्याचे अटी आहेत. यामुळे सचिवाची निवड तुर्तास केली जाणार नाही, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला असता अंगावर धावून जाण्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे दोन्ही गट आमने सामने आली. ग्रामसेवकाला टारगेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता वाढत्या तनावामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. दोन्ही गटाच्या सदस्यांना तंबी दिल्या नंतर तनाव निवळला.या दरम्यान निवड प्रक्रिया होणार असल्याचे लक्षात येताच ही या सभेत पानलोट समिती निवड पुढे ढकलण्यात आली.वाढत्या गोंधळ आणि तनावामुळे समितीची निवड करण्यात आली नाही. यानंतर कृषी विभागाचे अधिकारी सभेतून निघून गेले. पानलोट वरून आयोजित ग्रामसभा गाजताच निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. (वार्ताहर)