गोहत्या हा महाराष्ट्राला कलंक

By Admin | Updated: January 17, 2015 22:52 IST2015-01-17T22:52:26+5:302015-01-17T22:52:26+5:30

गोहत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. गो मातेची पूजा करण्याऐवजी त्याची हत्या केली जाते. जो या गोमातेची हत्या करतो तो आपला भाऊ होवू शकत नाही. तो कुठल्याही धर्मातला असो,

Cow slaughtering Maharashtra | गोहत्या हा महाराष्ट्राला कलंक

गोहत्या हा महाराष्ट्राला कलंक

भंडारा : गोहत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. गो मातेची पूजा करण्याऐवजी त्याची हत्या केली जाते. जो या गोमातेची हत्या करतो तो आपला भाऊ होवू शकत नाही. तो कुठल्याही धर्मातला असो, प्रत्येक हिंदू अशा मनुष्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प.पूं. रामबालकदास महाराज यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विराट हिंदू संमेलनात रामबालकदास महाराज बोलत होते.
मंचावर चित्रकुट येथील रविदास खाकी महाराज, साध्वी बालिका सरस्वती, जैविक शेतीतज्ज्ञ अन्नाजी हांडे, विहिपचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव, रमेश ठुब्रीकर, भदंत रावजी पिंडे, हबप श्याम महाराज हटवार, गोवर्धन चन्ने महाराज, नगराध्यक्ष बाबू बागडे, राजू वालिया, सुनिल मेंढे, सुभद्रा देवगडे, राम चाचेरे, रविंद्र भालेराव, डॉ. संजय एकापुरे, चिंतामण मेहर, बळवंत मुकेवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
रामबालकदास महाराज म्हणाले, हिंदू हा सनातन धर्म आहे. आराध्य दैवत श्रीराम हे फक्त अवतारी पुरूष नसून एक धर्म आहे. रावणाचे पुतळे जाळून काय साध्य केले ? प्रभु रामचंद्रांच्या आदर्शावर त्यांच्या आचरणातून व्यक्तिमत्व घडण्याचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी स्वत:मध्ये बदल करावा लागेल.

Web Title: Cow slaughtering Maharashtra