क्रांतिकारक बिरसा मुंडांच्या विचारांची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:51+5:30

नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद वरकडे, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, नरहरी वरकडे, मुकेश धूर्वे, शिवा धुर्वे, ऋषी इनवाते आदी उपस्थित होते.

The country needs the thoughts of revolutionary Birsa Mundas | क्रांतिकारक बिरसा मुंडांच्या विचारांची देशाला गरज

क्रांतिकारक बिरसा मुंडांच्या विचारांची देशाला गरज

Next
ठळक मुद्देअजाबराव चिचामे : चिखलाबोडीत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. याची जाणीव बिरसा मुंडा यांना त्या काळी होतीच. त्यामुळे शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्यांनी समाजप्रबोधन केले. याचाच परिणाम म्हणून आदिवासी जनजमातीने शिक्षण, स्वच्छता यांचा अंगीकार केला आहे. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन अजाबराव चिचामे यांनी केले.
नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद वरकडे, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, नरहरी वरकडे, मुकेश धूर्वे, शिवा धुर्वे, ऋषी इनवाते आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार निवृत्ती उईके म्हणाले, बिरसा मुंडा यांनी हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडा यांचे प्रश्न समोर घेऊन ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली. ते भारतीय क्रांतीची आधारभूमी आहे. कार्यक्रमाचे संचालन मुकेश धूर्वे यांनी तर आभार प्रदर्शन नरहरी वरकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: The country needs the thoughts of revolutionary Birsa Mundas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.