तुमसर : शहराचा वाढता व्याप बघता बाजारपेठ परिसरही दिवसेंदिवस फुलत चालला आहे. बाजारपेठेत परिसरात महिला प्रसाधनाची सुविधा नसल्यामुळे महिलांना कमालीचा त्रास होत आहे. याकडे लक्ष वेधण्याकरिता राष्ट्रवादी महिला काँग्रेसने नगराध्यक्षांना साकडे घातले.तुमसरची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. शहरासह तालुक्यातल्या इतर ग्रामीण भागातून नागरिक येथे बाजारहाट करण्याकरिता दररोज येतात. त्यामुळे बाजार पेटेचा परिसरही दिवसें दिवस वाढत आहे. त्यामुळे एकट्या बाजारपेठेत शिरल्यानंतर कमीत कमी २ ते ३ तासाचा कालावधी लागतो, अशा वेळेस लघुशंकेला प्रश्न उद्भवल्यास बाजारपेठेत तर सोडाच अन्यत्रठिकाणी सुद्धा महिलांकरीता प्रसाधन गृह नसल्यामुळे महिलांनी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा कल्याणी भुरे यांच्याकडे केली असता भुरे यांनी तात्काळ नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना शिष्टमंडळ घेवून साकडे दिले व बाजारपेठेत तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणीसुद्धा महिला प्रसाधनाची व्यवस्था करावी, असे निवेदनही दिले. यावेळी जिल्हाअध्यक्ष मिर्झा, निशिकांत पेठे, अंकुर ठाकूर, घनश्याम गुप्ता, हटवार व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)
प्रसाधन गृहाअभावी हेळसांड
By admin | Updated: July 9, 2016 00:34 IST