कोरंभी-बेला मंजूर रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:01 IST2018-10-26T22:01:19+5:302018-10-26T22:01:45+5:30
पर्यटन विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोरंभी-बेला रस्त्याला शासनाने मंजूरी दिली असून आता हा रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

कोरंभी-बेला मंजूर रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पर्यटन विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोरंभी-बेला रस्त्याला शासनाने मंजूरी दिली असून आता हा रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
कोरंभी येथे पर्यटन स्थळ आणि कोरंभी मातेचे प्रसिध्द देवस्थान आहे. त्याठिकाणी पर्यटकांची आणि भक्तांची मोठी वर्दळ असते. तसेच हा परिसर शैक्षणिक परिसर म्हणून ओळखला जाते. त्यामुळेही या रस्त्यावर मोठी गर्दी असते. तसेच शेतकऱ्यांसाठी ही हा माग्र महत्वपूर्ण आहे. मात्र गत काही वर्षांपासून या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. सर्वांचा याचा त्रास सहन करावा लागत होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन बेला येथून जाणारा जवळचा मार्ग असल्याने नागरिक त्याचाच उपयोग करीत होते. या रस्त्याची झालेली दयनिय अवस्था जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांच्या निदर्शनासाठी त्यांनी या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करुन सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले. विशेष अर्थसंकल्पात यासाठी निधी मंजूर झाला असून विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्याचे काम केले जाणार आहे. मात्र मंजूरी मिळाल्यानंतरही अद्याप कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी आहे.
गणेशपूर कोरंभी रस्त्याचे काम दिवाळीनंतर
भंडारा शहरातील गणेशपूर ते कोरंभी या रस्त्याचे काम दिवाळीनंतर सुरु होणार आहे. दोन कोटी ६१ लाख रुपयांचा या रस्त्यात गणेशपूर व कोरंभी येथे सिमेंटचा रस्ता आणि गणेशपूर येथे नालीचे बांधकाम होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर झाला असून रस्त्याची निवीदा प्रक्रिया सुरु असल्याचे कनिष्ठ अभियंता वैद्य यांनी सांगितले.