शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख २३ हजार व्यक्तींना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला हेल्थकेअर वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाइन कोरोना व्हॉरिअर्स यांना लस देण्यात आली. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात २६५ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली होती. आतापर्यंत एक लाख २२ हजार ८९७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यात एक लाख १२ हजार ४८५ व्यक्तींना पहिला डोस तर दहा हजार ४१२ व्यक्तींना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

ठळक मुद्देदहा हजार ४१२ जणांना दुसरा डोज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन आता अडीच महिने झाले असून, या कालावधीत एक लाख २२ हजार ८९७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. त्यातील १० हजार ४१२ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यात १६८ केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू असून, मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध आहेत. भंडारा जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला हेल्थकेअर वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाइन कोरोना व्हॉरिअर्स यांना लस देण्यात आली. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात २६५ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली होती. आतापर्यंत एक लाख २२ हजार ८९७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यात एक लाख १२ हजार ४८५ व्यक्तींना पहिला डोस तर दहा हजार ४१२ व्यक्तींना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत. कोविशिल्ड लस ५७ हजार ११३ व्यक्तींना तर कोव्हॅक्सिन लस ६५ हजार ७८४ व्यक्तींना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामुक्त मोहिमेसाठी लसीकरण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६८ केंद्रांवर कोरोनाची लस दिली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि काही खासगी रुग्णालयांतही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांची बेफिकीर वृत्ती त्याला कारणीभूत आहे. प्रशासनाच्यावतीने विविध निर्बंध लावल्यानंतरही नागरिक नियमांना पायदळी तुडवत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी यावे यासाठी मोहीम सुरू केली आहे. गावागावांत जनजागृती करून ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. ग्रामीण व शहरी भागात या लसीकरणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.

४५ वर्षांवरील    व्यक्तींचे लसीकरण   सुरुवातीला ६० वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात होती. मात्र १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. १ एप्रिल रोजी जिल्ह्यात १० हजार ६४५ व्यक्तींना लस देण्यात आली. त्यात १० हजार ३२१ व्यक्ती प्रथम डोस घेणाऱ्या आहेत. जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस