युथ युनियनतर्फे कोरोना लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:00+5:302021-08-29T04:34:00+5:30
युनियनच्या वतीने लोहारा गावातील प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरणाचे महत्त्व व फायदे सांगितले. त्यांच्यामधील जी भीती व गैरसमज होते ...

युथ युनियनतर्फे कोरोना लसीकरण शिबिर
युनियनच्या वतीने लोहारा गावातील प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरणाचे महत्त्व व फायदे सांगितले. त्यांच्यामधील जी भीती व गैरसमज होते ते त्यांनी दूर केले. त्यामुळे कोरोनापासून मुक्तता मिळावी यासाठी लसीकरण आवश्यक आहे. प्रत्येकाने लसीचा डोस घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने वर्तविले आहेत. त्यामुळे वेळीच लसीकरण होणे गरजेचे आहे. या वेळी दोन दिवसीय शिबिरात ३०० जणांचे लसीकरण करून आदर्श निर्माण केला. लसवंत गावासाठी आता केवळ २० टक्के लसीकरण शिल्लक आहे.
या कार्यक्रमात उत्कर्ष शहारे, बाबा बडगे, रितीक बांते, विनय रामटेके, नमन चढ्ढा, साहिल भोयर, वैभव समरीत, रोहित वाडीभस्मे, वैष्णवी दांडगे, वैष्णवी साकुरे, ट्विंकल ढोमणे, अमीक्षा पंचभाई, मृण्मयी ठाकरे आदी युथ युनियनच्या सदस्यांनी सहकार्य केले.