शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पर्यटन ठप्प, अनेकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद असल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनाचे कारण पुढे करून कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याकडे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी या भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पर्यटनमंत्र्यांना पत्र लिहून सदर पर्यटनस्थळ सुरु करण्याची विनंती केली आहे.

ठळक मुद्देरोजगारासाठी भटकंती : जिप्सी चालक, गाईड, रिसॉर्ट मालक यासह हॉटेल व्यावसायिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावाने गत पाच महिन्यांपासून नागझिरा अभयारण्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळ पूर्णत: बंद असून त्यावर आधारित अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. जिप्सी चालक, गाईड, रिसॉर्ट मालक यासह हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ताडोबा आणि टिपेश्वर अभयारण्याच्या बफर झोनमध्ये कोरोना काळातही पर्यटक येत आहेत. मात्र नागझिरा अभयारण्य बंद असल्याने सर्व काही ठप्प झाले आहे.भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात निसर्ग संपन्न परिसर आहे. नागझिरा अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. दररोज शेकडो पर्यटक याठिकाणी भेटी देत होते. त्यामुळे येथे अनेक व्यवसाय सुरु झाले. अनेकांनी जीप्सी विकत घेऊन वनविभागाच्या मार्गदर्शनात सफारी सुरु केल्या. गाईडचा व्यवसायही चांगला सुरु होता. रिसॉर्टमध्येही पर्यटकांची गर्दी दिसायची. यासोबतच अनेक तरुणांनी परिसरात खाद्यपदार्थांचे हॉटेल्स सुरु केले होते. परंतु आता येथील वस्तूस्थिती अतिशय विदारक आहे. गत सहा महिन्यांपासून एकही पर्यटक येथे फिरकला नाही. त्यामुळे अभयारण्यावर आधारित अनेकांची उपासमार होत आहे.अशीच स्थिती तुमसर तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या चांदपूर पर्यटन स्थळ आहे. सुंदर तलाव, निसर्गरम्य डोंगर आणि सुप्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची रेलचेल असते. उपजीवीकेसाठी अनेकांनी या ठिकाणी पूजा साहित्य व खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने सुरु केली होती. परंतु गत पाच महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. येथील व्यवसायीकांना आता दुसरा रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चोरखमारा, बोदलकसा या जलाशयावरही भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. बोदलकसा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. परंतु तेही आता बंद आहे. परिसरातील नागरिकांसाठी असलेल्या रोजगाराच्या संधीही यामुळे संपुष्टात आल्या आहेत.ताडोबा-टिपेश्वर सुरुविदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा आणि यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील बफर झोन सुरु आहे. तेथे कोरोना काळातही पर्यटक येत आहेत. मात्र भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य पूर्णपणे बंद असल्याने समस्या वाढत आहे.पर्यटनमंत्र्यांना मनसेचे साकडेभंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद असल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनाचे कारण पुढे करून कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याकडे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी या भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पर्यटनमंत्र्यांना पत्र लिहून सदर पर्यटनस्थळ सुरु करण्याची विनंती केली आहे. यासोबतच या भागातील रस्ते, निवास व्यवस्था आदीकडेही पर्यटनमंत्र्यांचे लक्ष केंद्रीत केले आहे. लवकरात लवकर पर्यटन केंद्र सुरु करावे आणि या भागात राहणाºया नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनातून त्यांनी केली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या