राष्ट्रीय महामार्गावरील मद्यपी वाहनचालकांच्या कारवाईत कोरोनाचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:47+5:302021-07-03T04:22:47+5:30
बॉक्स कोरोनात ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद सर्व वाहन चालकांना मास्क सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे या मशीनचा वापर बंद ...

राष्ट्रीय महामार्गावरील मद्यपी वाहनचालकांच्या कारवाईत कोरोनाचा अडथळा
बॉक्स
कोरोनात ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद
सर्व वाहन चालकांना मास्क सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे या मशीनचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यपी चालकांचे शासन नियमांमुळे फावले आहे. मद्यप्राशन केल्याने अनेक वाहनचालकांकडून यामुळे अपघात घडू शकतात. मात्र शासनाच्या आदेशानुसार कामकाज करावे लागत असल्याने अनेकदा पोलिसांना मर्यादा येतात.
बॉक्स
कोरोना काळात महामार्गावरील वाहतुकीत घट
कोरोना संसर्गाच्या काळात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही घटली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांच्या तोंडाला मास्क आहे का तसेच करून नियमांचे पालन होत असल्याची खात्री करत होते. त्यामुळे या काळात फारशा कारवाया झाल्या नाहीत. तसेच ब्रेथ ॲनालायझर वापरही बंद होता त्यामुळे मद्यपी चालक कोण आहे हे समजणे कठीण होते मात्र, असे असले तरीही पोलिसांना संशय येताच मद्यपी चालकांवर काही कारवाया करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.