कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझर वापरावर बंदी, तळीरामांना खुले रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST2021-02-16T04:35:50+5:302021-02-16T04:35:50+5:30

बॉक्स कोरोनामुळे तळीरामांची कारवाई शून्यावर जिल्ह्यात 23 मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांनाही ...

Corona bans breath analyzer use, open air to Taliram | कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझर वापरावर बंदी, तळीरामांना खुले रान

कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझर वापरावर बंदी, तळीरामांना खुले रान

बॉक्स

कोरोनामुळे तळीरामांची कारवाई शून्यावर

जिल्ह्यात 23 मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांनाही घराबाहेर पडण्यास कोरोनामुळे निर्बंध घालण्यात आले होते. यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरब्रेथ ॲनालायझरच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे जानेवारी महिन्यात आठ, तर फेब्रुवारीत सहा अशा दोन महिन्यांत १४ कारवाया झाल्या आहेत. तर इतर महिन्यात लॉकडॉऊन कालखंडात ड्रंक अँड ड्राइव्ह या कारवाया झीरो दिसून येत आहेत.

बॉक्स

मद्य विक्रीवर कोरोनाचा परिणाम

यावर्षी कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील अनेक बीअर बार, तसेच हॉटेल बंद झाले होते. त्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्यातील मध्य विक्रीवर झालेला दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास बंदी असल्यानेही तळीरामांना एकत्र मद्य प्राशन करता आले नाही. याशिवाय शासनाला मिळणारा महसूल घटला असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार मध्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसारच दुकाने सुरू करण्यात आली. मात्र, यावर्षी मध्य विक्रीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Corona bans breath analyzer use, open air to Taliram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.