शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचा पारंपरिक बाज हरपला

By admin | Updated: October 7, 2014 23:29 IST

प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा ट्रेंड बदलू लागलेला आहे. दिवसगणिक प्रचाराची यंत्रणा हायटेक होऊ लागल्याने जमिनीवरची रंगत हरपली आहे. पूर्वी अनुभवाला येणारी रणधुमाळी, गगनभेदी

भंडारा : प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा ट्रेंड बदलू लागलेला आहे. दिवसगणिक प्रचाराची यंत्रणा हायटेक होऊ लागल्याने जमिनीवरची रंगत हरपली आहे. पूर्वी अनुभवाला येणारी रणधुमाळी, गगनभेदी घोषणा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत.ताईबाई अक्का, विचार करा पक्का... वरच मारा शिक्का, अशा घोषणा आता निवडणूक प्रचारातून बंद झाल्यात. मतदान यंत्रामुळे ईव्हीएम शिक्का शब्द कालबाह्य झाला. यासर्व प्रकारची जागा आता इंटरनेट, फेसबुक टिष्ट्वटर या हायटेक प्रचारमाध्यमांनी घेतल्याने प्रचाराचा पारंपरिक बाज हरपला आहे. निवडणूक म्हटली की, रणधुमाळी आलीच. पूर्वी उमेदवारांची रॅली म्हटली की, विरोधकांची खिल्ली उडवीत स्वत:चे कर्तव्य सिद्ध करणाऱ्या गगनभेदी घोषणा परिसर दणाणून सोडायच्या. आपलीच पार्टी किती शक्तिशाली आहे. याचा गौरव घोषणांनी व्हायचा. आता यावर आदर्श आचारसंहितेने बंधने घातली आहेत. तसे पाहता राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवारांच्या मुसक्या निवडणूक आचारसंहितेने आवळल्या आहेत. पैशाच्या वारेमाप उधळपट्टीवर आता लगाम घातला गेला आहे. निवडणुकीमध्ये पूर्वी जो प्रचाराचा जोश होता तो आता राहिला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्येदेखील निरूत्साह आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आधी उमेदवार निश्चित होत होते. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी कित्येक दिवस अगोदर सुरू व्हायची. यावेळीही विधानसभा निवडणुकीत नामांकन भरण्याच्या अंतिम दिवशी महायुती व आघाडी यांच्या घटक पक्षात ताटातूट झाली. स्वबळावर लढण्याचे पावित्र्याने ऐनवेळी उमेदवार जाहीर केल्या गेले. पूर्वी गावातील पेंटरचा उपयोग भिंती रंगविण्यासाठी केला जायचा. आता निवडणूक प्रचारापासून तर मतदानापर्यंत ईलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. (प्रतिनिधी)