शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा येथे दूषित पाणी पुरवठा

By admin | Updated: November 9, 2014 22:28 IST

कोंढा येथे वॉर्ड क्र. ३ मध्ये हँडपंपला दुषित पाणी तीन महिन्यापासून येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोंढा कोसरा : कोंढा येथे वॉर्ड क्र. ३ मध्ये हँडपंपला दुषित पाणी तीन महिन्यापासून येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कोंढा ग्रा.पं. ने गावात पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी हँडपंप, नळयोजना तयार केली. पण सध्या भारनियमनामुळे वॉर्ड क्र. ३ मध्ये दोन, तीन दिवस नळ येत नाही. अशावेळी पिण्याच्या पाण्यासाठी हँडपंपवर नागरिकांना अवलंबून राहावे लागते. तीन महिन्यांपासून हँडपंपाला गढूळ, लालसर, खराब, दुषित पाणी येत आहे. याची तक्रार ग्रा.पं. कार्यालयास दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. असे वॉर्डातील नागरिकांचे म्हणणे आहे. सुभाष वॉर्ड क्र. ३ मध्ये ४ हँडपंप आहेत. त्यापैकी १ नादुरुस्त असून रामनाथ सेलोकर यांच्या घराजवळील हँडपंपवर पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड गर्दी असते. दुषित पाणी पिल्याने नागरिकांना अतिसार कावीळ, गळ्याचे आजार बळावण्याची शक्यता आहे. सुभाष वॉर्ड क्र. ३ चे सदस्य उपसरपंच गौतम टेंभुर्णे, मनिषा लिचडे, ज्ञानदेव कुर्झेकर हे आहेत. त्यांना अनेकदा दुषित पाणी येत असल्याचे सांगितले. पण त्यांचे दुर्लक्ष होत आहे. कोंढा येथीलनागरिकांनी सरपंचशिला कुर्झेकर व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुर्झेकर यांना देखील या संबंधात माहिती दिली. नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने इतर वॉर्डातून दूर अंतरावरून डोक्यावर घागरीने पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या संबंधात सरपंच शिला कुर्झेकर यांना विचारले असता वॉर्ड क्र. ३ मधील नागरिकांची तक्रार प्राप्त होताच आठ दिवसापूर्वी जि.प. भंडारा येथे ग्राम विकास अधिकारी यांच्यातर्फे पत्र पाठविले आहे. तसेच पं.स. पवनी येथे देखील पत्र देवून दुरुस्ती करण्यासंबंधी कारवाई लवकरच होईल असे सांगितले. सुभाष वॉर्ड क्र. ३ मधील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी हँडपंप दुरुस्त करून शुद्ध पिण्याचे पाणी न मिळाल्यास ग्रा.पं. कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे कैलाश वंजारी, विठ्ठल जांभुळकर, विलास मोहरकर, सुनिल माकडे, नाना लिचडे, गांधी तलमले, मोतीलाल जांभुळकर, रोशन कुर्झेकर, दिनेश खंडाते, मंगला जांभुळकर, शिल्पा वंजारी, वैशाली सेलोकर, मंगला सेलोकर व स्त्री पुरुषांनी लेखी तक्रारीद्वारे केली आहे. या संबंधी आरोग्य विभागाला देखील तक्रार केली आहे. (वार्ताहर)