कान्हळगावात मॉडेल ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम

By Admin | Updated: January 13, 2016 00:39 IST2016-01-13T00:39:19+5:302016-01-13T00:39:19+5:30

कान्हळगाव ग्रामपंचायतीची ईमारत मोडकळीस आली होती. गावकऱ्यांना बसण्यासाठी, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुध्दा अडचणींचा सामना करावा लागत होता.

Construction of Model Gram Panchayat building in Kanhalgaon | कान्हळगावात मॉडेल ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम

कान्हळगावात मॉडेल ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम

जनसुविधेतून मिळाला १२ लाखांचा निधी : ‘नो प्रॉफिट, नो लॉस’ तत्त्वावर बांधकाम
करडी (पालोरा) : कान्हळगाव ग्रामपंचायतीची ईमारत मोडकळीस आली होती. गावकऱ्यांना बसण्यासाठी, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुध्दा अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात परिस्थिती गंभीर असायची. सरपंच व सदस्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निधीची मागणी केली. परंतू १५ वर्षांपासून प्रश्न सुटत नव्हता. अखेर जनसुविधा योजनेतून १२ लाख रूपयांया निधीला मंजूरी मिळाली. ‘नो लॉस, नो प्रॉफीट’ तत्वावर ग्रामपंचायतीची सुसज्ज व अत्याधुनिक सुविधांनी युक्त मॉडेल ईमारतीचे बांधकाम करुन प्ररेणादायी उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे.
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव ग्रामपंचायतीच्या मोडकळीस आलेल्या ईमारतीच्या बांधकामासाठी सरपंच गिता रोडके व उपसरपंच दिगांबर कुकडे आणि सदस्यांनी अनेक योजनांचा अभ्यास केला. त्यामध्ये बीआरजीएफ योजनेचाही समावेश होता. मात्र टप्प्याटप्प्याने निधी मिळत असल्याने योजना पटत नव्हती.
ग्रामपंचायतीला त्यांच्या मनातील कल्पना साकार करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जनसुविधा योजनेची निवड केली. परंतू या योजनेसाठी डिपीडिसीकडे अनेक ग्रामपंचायतीचे अर्ज होते. निधी मंजुरीसाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य बाबु ठवकर यांनी पुढाकार घेतला. १२ लाखांच्या निधीत अत्याधुनिक सुविधानीयुक्त सुंदर, आकर्षक व सर्वांच्या मनात भरणारी मॉडेल ईमारत तयार करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अभियंता बोरकर यांना साकडे घातले. मनाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करवून घेतला.
कामाच्या आराखड्यात मनातील कल्पनांना मुर्त रुप देण्यात आले. कामाचे कंत्राट ग्राम पंचायतीने स्वत:कडे ठेवले. नो लॉस, नो प्राफिट तत्वावर बांधकाम करण्यास सुरुवात झाली.
कल्पनेप्रमाणे बांधकामासाठी गावातील गवंडी काम करणाऱ्या तरुणाला काम देण्यात आले. अंदाजपत्रकात नमुद नसलेली अनेक कामे उरकुन घेण्यात आली. आतील कामाबरोबर बाहेरिल भागाचे काम आकर्षक पध्दतीने करण्यात आले. त्यातून एक देखनी इमारत आकाराला आली.
ग्राम पंचायत इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी आमदार चरण वाघमारे यांनी निधी दिला असून बांधकाम सुरु आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला पर्यावरण रत्न पुरस्काराचा निधी बगीच्याच्या उभारणीसाठी राखून ठेवलेला असून त्यातून बगीच्याची उभारणी होणार असल्यची माहिती आहे.
कान्हळगाव हे १२०० लोकवस्तीचे गाव असून ग्रामपंचायतीला हागणदारी मुक्त ग्राम, पर्यावरण रत्न ग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, १०० टक्के कर वसुली आदी पुरस्कार मिळालेले असून त्या निधीतून अनेक विकासाची कामे करण्यात आली आहेत. (वार्ताहर)

Web Title: Construction of Model Gram Panchayat building in Kanhalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.