बांधकाम ठेकेदाराने सात जणांचे पैसे घेऊन केला पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:12+5:302021-08-19T04:39:12+5:30

भंडारा : घरबांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने सात जणांचे ४ लाख ३६ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना तुमसर तालुक्यातील डोंगरी ...

The construction contractor did it with the money of seven people | बांधकाम ठेकेदाराने सात जणांचे पैसे घेऊन केला पोबारा

बांधकाम ठेकेदाराने सात जणांचे पैसे घेऊन केला पोबारा

भंडारा : घरबांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने सात जणांचे ४ लाख ३६ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज. येथे उघडकीस आली. पैसे घेऊन पळाल्याने अनेकांचे घराचे बांधकाम रखडले आहे.

सुरेश मोहन राहांगडाले (४०) रा.डोंगरी बुज. असे पसार झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याने नारायण महादेव शेंद्रे यांच्याकडून ९० हजार रुपये, ललीत जुनघरे यांच्याकडूनही ९० हजार रुपये, विजय राहांगडाले यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये, वंदना ठाकरे यांच्याकडून ४१ हजार ५०० रुपये, अमोल गंगबोईर यांच्याकडून रोख ५० हजार रुपये नवीन घराच्या बांधकामासाठी ॲडव्हान्स घेतले होते, तसेच श्याम बिसने यांच्या दुकानातून २० हजार रुपयांचे साहित्य उधारीवर घेतले. यासोबतच एस.कापसे यांच्याकडून ३५ हजारांचे बांधकाम साहित्य घेतले; मात्र तो गावातून पसार झाला. त्याचा शोध घेतला असता, कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर नारायण शेंद्रे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. गोबरवाही पोलिसांनी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घराचे पैसे घेऊन ठेकेदार पसार झाल्याने अनेकांचे घराचे बांधकाम अर्धवट आहे. आता पोलिसांसोबत घरमालकही या बांधकाम ठेकेदाराचा शोध घेत आहेत.

Web Title: The construction contractor did it with the money of seven people