शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

मापिसा कायदा विरोधात काँग्रेसचे निदर्शने

By admin | Updated: September 8, 2016 00:35 IST

राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी एक्ट २०१६ मापिसा या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला.

मोहाडी : राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी एक्ट २०१६ मापिसा या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला. हा कायदा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तसेच आंदोलन चिरडण्यााठी बनविण्यात आल्याचा आरोप करून हा कायदा रद्द करावा, यासाठी मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यानंतर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले व तहसीलदार धनंजय देशमुख यांना निवेदन देण्यात आले.या कायद्यात १०० पेक्षा जास्त समुदाय असलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी बंधनकारक करण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांवर लादण्यात आली आहे. लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, वाढदिवस आदी सारखे घरगुती कार्यक्रमावर यामुळे बंधन येईल. पोलिसांविरूद्ध टिका करता येणार नाही.नाटक, चित्रपट, पथनाट्य अथवा मनोरंजनात्मक कार्यक्रमात पोलिसांचा पेहराव घालण्यास बंधन टाकण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या चुकीच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही, जनआंदोलन, रास्तारोको, बंद सारख्या आंदोलनांना रोखण्यासाठी पोलिसांना ज्यादा अधिकार देण्यत आलेले आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असून सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याने हा कायदा रद्द करावा, अशी मागणी मोहाडी तालुका काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभू मोहतुरे, मनोहर सिंगनजुडे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, महिला काँग्रेस अध्यक्ष सिमा भुरे, न.प. उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, जिल्हा दुग्ध संचालक आशिष पातरे, प्रमोद तितीरमारे, अमरनाथ रगडे, वामन थोटे, देवेंद्र इलमे, महेश निमजे, गिता बोकडे, अरुणा श्रीपाद, कविता बावणे, ज्योती चिंधालोरे, दिपक नागदेवे, अजीत गजभिये, दुर्याेधन अटराये, प्रदीप वाडीभस्मे, राजन सिंगनजुडे, संतोष मोहतुरे, कैलास पिकलमुंडे, प्रकाश धार्मिक, अनुप उटाणे, मिलिंद नागदेवे, के.के. पंचबुद्धे, बोधानंद, देवराम बोंदरे, वंदना मेश्राम, मिना निखारे, रागीनी सेलोकर, डुलीचंद लिल्हारे, ग्यानीराम शेंडे, राजेश गभने, वेदान्ता गंगाभोज, विनोद वैद्य, गणेश निमजे, वंदना मेश्राम, प्रकाश धार्मिक, देवराम बोंदरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)