काँग्रेसतर्फे ५० हजार कुटुंबांना मदत पोहचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात जवळपास पन्नास हजार कुटुंबांपर्यंत सदर अन्न धान्य ...

काँग्रेसतर्फे ५० हजार कुटुंबांना मदत पोहचविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात जवळपास पन्नास हजार कुटुंबांपर्यंत सदर अन्न धान्य लॉकडाऊन वाढल्यास टप्प्याटप्याने पोहचविण्यात येतील. पहिली खेप प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रानुसार पाठविण्यात आली आहे. अति गरजूंच्या घरी शिधा किट पोहोचत्या करून सदर मदत करण्यात येणार आहे, असा निर्धार जिल्हा काँग्रेसने घेतला आहे.
जगात आणि देशभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असूना सरकारने लॉकडाउनचे आदेश जारी केले असतांना अनेक व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत. यादरम्यान रोज मजूरी करणारे मजुर मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या कालावधीत मजुरीअभावी अनेकांवर उपासमारीचे संकट परिसरात बघायला मिळत होते.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अखिल भारतीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळा थोरात यांच्या आदेशानुसार तसेच विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातील गोरगरीब मोलमजुरी करणारे कुणीही व्यक्ती लॉकडाउन दरम्यान उपाशीपोटी राहु नये यासाठी जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, धनराज साठवणे, महेंद्र निंबार्ते, अनीक जमा पटेल, मुकुंद साखरकर, दिलीप निखाडे, प्रशांत देशकर, धर्मेंद्र गणवीर, नाहिद परवेझ, पवन वंजारी, मंगेश हुमणे, सचिन फाले, शाहीन मून आदी उपस्थित होते.