शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंबेडकर समाजविरोधी; आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 19:31 IST

अनेक दशकांपासून पटोले आंबेडकरी समाजविरोधी भूमिका घेत आहेत.  इतक्या वर्षांनंतरही आंबेडकरी समाज पटोलेंचे षडयंत्र समजू शकला नाही. - मेश्राम

भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणे अपेक्षित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी दिली नाही. काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. 

भंडारा येथे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते परमानंद मेश्राम, प्राचार्य पूरण लोणारे, प्राणहंस मेश्राम, अ‍ॅड. निलेश डहाट, प्रज्ञा नंदेश्वर, भीमराव मेश्राम यांनी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. नाना पटोले यांच्यावर ताशेरेही ओढले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध नोंदविताना परमानंद मेश्राम म्हणाले, अनेक दशकांपासून पटोले आंबेडकरी समाजविरोधी भूमिका घेत आहेत.  इतक्या वर्षांनंतरही आंबेडकरी समाज पटोलेंचे षडयंत्र समजू शकला नाही. जगाने दखल घेतलेल्या खैरलांजी हत्याकांडावेळी पटोले यांनी खैरणा ते खैरलांजी अशी पदयात्रा काढून आंबेडकरी समाजाविरोधी भूमिका घेतली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

काँग्रेसला आंबेडकरी समाजाची मते हवी आहेत. परंतु, या प्रवर्गाला नेतृत्व देण्याची संधी मिळते तेव्हा काँग्रेस ती नाकारते. डोक्यावर संविधान ठेवून आंबेडकरी समाज काँग्रेसला साथ देईल, असा भ्रम काँग्रेसला झाला आहे. परंतु, आमची संधी नाकारणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशाराही मेश्राम यांनी दिला. 

भंडारा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती प्रवर्गाचे मतदार ९० हजारांपेक्षा अधिक आहेत. परंतु, आंबेडकरवादी विचारधारा असलेल्या व्यक्तीला काँग्रेस उमेदवारी देत नाही. फक्त जातीय राजकारण करून विशिष्ट जातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले जवळ करतात. अशा जातीयवादी नेत्यांना समाजाने त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहनही मेश्राम यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस