शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:00 IST

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक त्रिमूर्ती चौकात बुधवारी निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देभंडारात निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक त्रिमूर्ती चौकात बुधवारी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. हातात काँग्रेसचा ध्वज घेतलेले काँग्रेस कार्यकर्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढील त्रिमुर्ती चौकात एकात्र आले. तेथे त्यांनी इंधन दरवाढी विरुद्ध सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर एक निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. त्यात विविध मागण्यांचा समावेश होतो. खरीप हंगामात शेतकºयांना पीक कर्जाच्या नावाखाली राष्ट्रीकृत बँकांकडून अडवणूक होत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जेमतेम २५ टक्के पीक कर्ज वाटप झालेले. यामुळे शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. बँकांनी शेतकºयांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल-डिझेलच्या वाढीव किमती मागे घ्याव्यात, या मागणी सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटी प्रकरणी सरकारने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाई करावी, मुंबई येथे भिंत कोसळून २७ जणांचे बळी गेले. सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून दीड वषार्पुर्वीच ही भिंत बांधण्यात आली होती. बांधकामात गैरप्रकार झाल्याने ही भिंत कोसळल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला. भाजप-शिवसेनेच्या काळात पाच वर्षांपासून सातत्याने गैरप्रकार करणाºयांना संरक्षण दिले जाते. अनेक प्रकरणात विरोधीपक्ष आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी अनेकदा ठोस पुरावे देऊनही सरकारने गैरप्रकार करणाºयांना क्लीन चिट देण्याची भूमिका घेत्याचे या निवेदनात म्हटले आहे.मधुकर लिचडे, विकास राऊत, अशोक मोहरकर, राजकपूर राऊत, प्रेमदास वनवे, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे, महेंद्र निंबार्ते, मुकुंद साखरकर, शंकर तेलमासरे, भूमेश्वर महावाडे, डॉ चंद्रकांत निंबार्ते, प्रशांत देशकर, रणवीर भगत, आणिक जमा पटेल, चित्रा सावरबांधे, प्यारेलाल वाघमारे, सचिन घनमारे, जयश्री बोरकर, शमीम शेख, कमलाकर रायपूरकर, धनराज साठवणे, मार्कंड भेंडारकर, मंगेश हुमने, मनोहर उरकूडकर, उत्तम भागडकर, विशाल तिरपुडे, पृथ्वी तांडेकर, प्रिया खंडाते, भाऊ कातोरे, सुरेखा सहारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढ