शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसच्या पदयात्रेने भंडारा दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाखनी येथून काॅंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शेकडाे ट्रॅक्टर आणि बैलबंडी काॅंग्रेसचे झेंडे लावून सहभागी झाले हाेते. विविध घाेषणा देत ही पदयात्रा दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारगाव येथे पाेहाेचली. तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ही पदयात्रा भंडारा शहरात आली. त्रिमुर्ती चाैक मार्गे मुख्य मार्गावरुन गांधी चाैकात पाेहाेचली.

ठळक मुद्देशेतकरी आंदाेलनाला पाठींबा : ट्रॅक्टर व बैलबंडीने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिल्ली येथील शेतकरी आंदाेलनाच्या समर्थनार्थ जिल्हा काॅंग्रेस कमेटीच्यावतीने गुरुवारी लाखनी ते भंडारा पदयात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते. शेकडाे ट्रॅक्टर, बैलबंडीसह निघालेल्या या पदयात्रेने भंडारा शहर दणाणून गेले हाेते. रॅलीच्या समाराेपात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टिका केली.गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाखनी येथून काॅंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शेकडाे ट्रॅक्टर आणि बैलबंडी काॅंग्रेसचे झेंडे लावून सहभागी झाले हाेते. विविध घाेषणा देत ही पदयात्रा दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारगाव येथे पाेहाेचली. तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ही पदयात्रा भंडारा शहरात आली. त्रिमुर्ती चाैक मार्गे मुख्य मार्गावरुन गांधी चाैकात पाेहाेचली. दरम्यान धुवाधार पाऊस बरसत असतानाही ही पदयात्रा मार्गक्रमण करीत हाेती. ढाेल ताशांच्या गजरात शेकडाे काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी झाले हाेते. या पदयात्रेचे नेतृत्व काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केले. या पदयात्रेत आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश काॅंग्रेसचे अतुल लाेंढे, मुजीब पठाण, जीया पटेल, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माेहन पंचभाई, प्रेमसागर गणविर, मधुकर लिचडे, जिल्हा महिला काॅंग्रेसचे अध्यक्ष जयश्री बाेरकर, सीमा भुरे, राजकपूर राऊत, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी किशाेर गजभिये, गाैरीशंकर माेटघरे, अजय गडकरी, शिशीर वंजारी, अभिजीत वंजारी, शफील लद्धानी, धनंजय साठवणे, मनाेज बागडे, प्रसन्ना चकाेले, ॲड. विनाेद बावनकर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. भंडारा शहरातील महात्मा गांधी चाैकात समाराेप सभा झाली. यावेळी शेकडाे नागरिक उपस्थित हाेते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही काही काळ खाेळंबली हाेती. प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नाना पटाेले यांचे भंडारा शहरात आगमन झाले. त्यावेळी त्यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

केंद्र सरकार धाेकेबाज सरकार - नाना पटाेले शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट हमीभाव देवू, पेट्राेल, डिझेल यासह जीवनावश्यक वस्तुंचे भाव आटाेक्यात आणू, अशी हमी देत केंद्रात माेदी सरकार गत सहा वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र हम दाे हमारे दाे यांनाच लाभ देण्याच्या दृष्टीकाेणातून केंद्र सरकार काम पाहत आहे. शासकीय निमशासकीय संपत्ती विकूण देश विकायला निघाले. केंद्रातील हे सरकार धाेकेबाज सरकार आहे, असे प्रतिपादन प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटाेले यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घनाघात केला.  काॅंग्रेसने ६० वर्षात काय केले असा सवाल विचारला जाताे. काॅंग्रेसने सुईपासून तर राकेटपर्यंत आपल्या कार्यकाळात निर्माण केले. या ६० वर्षात संविधान सांभाळले, असे नाना पटाेले म्हणाले. धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हाेत आहे. बैठका घेवून त्यावर ताेडगा घेवू असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले हाेते. मात्र बैठकीची प्रतीक्षा करण्यातच वेळ गेला. परिणामी शेतकऱ्यांच्या धानाचे अताेनात नुकसान झाले. हजाराे क्विंटल धानाची माेजणीच झाली नाही, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले