काॅंग्रेसच्या पदयात्रेने भंडारा दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST2021-02-19T05:00:00+5:302021-02-19T05:00:27+5:30
गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाखनी येथून काॅंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शेकडाे ट्रॅक्टर आणि बैलबंडी काॅंग्रेसचे झेंडे लावून सहभागी झाले हाेते. विविध घाेषणा देत ही पदयात्रा दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारगाव येथे पाेहाेचली. तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ही पदयात्रा भंडारा शहरात आली. त्रिमुर्ती चाैक मार्गे मुख्य मार्गावरुन गांधी चाैकात पाेहाेचली.

काॅंग्रेसच्या पदयात्रेने भंडारा दणाणले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिल्ली येथील शेतकरी आंदाेलनाच्या समर्थनार्थ जिल्हा काॅंग्रेस कमेटीच्यावतीने गुरुवारी लाखनी ते भंडारा पदयात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते. शेकडाे ट्रॅक्टर, बैलबंडीसह निघालेल्या या पदयात्रेने भंडारा शहर दणाणून गेले हाेते. रॅलीच्या समाराेपात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टिका केली.
गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाखनी येथून काॅंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शेकडाे ट्रॅक्टर आणि बैलबंडी काॅंग्रेसचे झेंडे लावून सहभागी झाले हाेते. विविध घाेषणा देत ही पदयात्रा दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारगाव येथे पाेहाेचली. तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ही पदयात्रा भंडारा शहरात आली. त्रिमुर्ती चाैक मार्गे मुख्य मार्गावरुन गांधी चाैकात पाेहाेचली. दरम्यान धुवाधार पाऊस बरसत असतानाही ही पदयात्रा मार्गक्रमण करीत हाेती. ढाेल ताशांच्या गजरात शेकडाे काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी झाले हाेते.
या पदयात्रेचे नेतृत्व काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केले. या पदयात्रेत आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश काॅंग्रेसचे अतुल लाेंढे, मुजीब पठाण, जीया पटेल, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माेहन पंचभाई, प्रेमसागर गणविर, मधुकर लिचडे, जिल्हा महिला काॅंग्रेसचे अध्यक्ष जयश्री बाेरकर, सीमा भुरे, राजकपूर राऊत, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी किशाेर गजभिये, गाैरीशंकर माेटघरे, अजय गडकरी, शिशीर वंजारी, अभिजीत वंजारी, शफील लद्धानी, धनंजय साठवणे, मनाेज बागडे, प्रसन्ना चकाेले, ॲड. विनाेद बावनकर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. भंडारा शहरातील महात्मा गांधी चाैकात समाराेप सभा झाली. यावेळी शेकडाे नागरिक उपस्थित हाेते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही काही काळ खाेळंबली हाेती. प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नाना पटाेले यांचे भंडारा शहरात आगमन झाले. त्यावेळी त्यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
केंद्र सरकार धाेकेबाज सरकार - नाना पटाेले
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट हमीभाव देवू, पेट्राेल, डिझेल यासह जीवनावश्यक वस्तुंचे भाव आटाेक्यात आणू, अशी हमी देत केंद्रात माेदी सरकार गत सहा वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र हम दाे हमारे दाे यांनाच लाभ देण्याच्या दृष्टीकाेणातून केंद्र सरकार काम पाहत आहे. शासकीय निमशासकीय संपत्ती विकूण देश विकायला निघाले. केंद्रातील हे सरकार धाेकेबाज सरकार आहे, असे प्रतिपादन प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटाेले यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घनाघात केला.
काॅंग्रेसने ६० वर्षात काय केले असा सवाल विचारला जाताे. काॅंग्रेसने सुईपासून तर राकेटपर्यंत आपल्या कार्यकाळात निर्माण केले. या ६० वर्षात संविधान सांभाळले, असे नाना पटाेले म्हणाले. धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हाेत आहे. बैठका घेवून त्यावर ताेडगा घेवू असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले हाेते. मात्र बैठकीची प्रतीक्षा करण्यातच वेळ गेला. परिणामी शेतकऱ्यांच्या धानाचे अताेनात नुकसान झाले. हजाराे क्विंटल धानाची माेजणीच झाली नाही, असे ते म्हणाले.