काँग्रेस कमिटीने केला कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST2021-06-10T04:23:53+5:302021-06-10T04:23:53+5:30

पवनी तालुका व शहर युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. रुयाळ (सिंदपुरी) येथील ...

Congress Committee felicitates Corona Warriors | काँग्रेस कमिटीने केला कोरोना योद्धांचा सत्कार

काँग्रेस कमिटीने केला कोरोना योद्धांचा सत्कार

पवनी तालुका व शहर युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. रुयाळ (सिंदपुरी) येथील केंद्र जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात रोल मॉडेल ठरले आहे. डॉ. गुरुचरण नंदागवळी यांनी केंद्राच्या प्रभारी डॉ. चेतना वाघ यांच्या यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला. तसेच सेवा देणाऱ्या परिचारिका, वाॅर्ड बाॅय, वाहनचालक या सर्वांनी मनोभावे रुग्णांची सेवा केली. सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, असे मत व्यक्त केले. डॉ. चेतना वाघ म्हणाले, मोहन पंचभाई यांच्या सहकार्याने उपचार केंद्रावरील कित्येक अडचणीवर मात करून रुग्णसेवा करता आली. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, जिल्हा काँग्रेसचे माध्यम समन्वयक अशोक पारधी यांनी कोरोना काळातील कोरोना योद्धांच्या कार्याचा गौरव केला. सत्कारमूर्ती डॉ. गुरुचरण नंदागवळी, डॉ. चेतना वाघ, शाहीद अली, प्रदीप घाडगे व अन्य आरोग्य सेवक, शिक्षक व होमगार्ड यांचाही स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी मोहन पंचभाई होते. अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुरुचरण नंदागवळी, कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ.चेतना वाघ, शंकरराव तेलमासरे, अशोक पारधी, प्रदीप घाडगे, शाहिद अली, अनिकेत गभने अमित पारधी, तुषार भोगे सर्व उपस्थित होते. यावेळी अल्ताफ पटेल, तुषार जावळे, इरफान शेख, कौस्तुभ दिवठे, मंगेश दीघोरे व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन राजेश तलमले यांनी तर आभार तुषार भोगे यांनी मानले.

Web Title: Congress Committee felicitates Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.