जिल्हा रुग्णालयाची स्थिती नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:06+5:302021-04-24T04:36:06+5:30
भंडारा : माेठ्या आशेने काेराेनाबाधित रुग्णांना डाॅक्टरांनी परिचारिकांच्या हवाली केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मनस्ताप सहन करावा लागत ...

जिल्हा रुग्णालयाची स्थिती नियंत्रणाबाहेर
भंडारा : माेठ्या आशेने काेराेनाबाधित रुग्णांना डाॅक्टरांनी परिचारिकांच्या हवाली केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सुटीवर असल्याने येथील कारभार नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील सर्वाधिक माेठे रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओळख आहे. अग्नितांडवाने संपूर्ण देशात या रुग्णालयाची कुप्रसिद्धी झाली. आता काेराेना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेवर आणि याेग्य सुविधा मिळेल, अशी अपेक्षा आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने यंत्रणेवर भार येताेय हे मान्य; परंतु मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांकडे तरी याेग्य लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वाॅर्ड क्रमांक १५ मध्ये सुविधांचा प्रचंड अभाव आहे. येथील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक विविध समस्यांचा सामना करीत आहे. याबाबत एका रुग्ण नातेवाइकाची आपबिती शुक्रवारी ‘लाेकमत’ने प्रसिद्ध केली. त्यानंतर आराेग्य यंत्रणा जागी झाली; परंतु प्रभावी उपाय मात्र झाले नाहीत. याचे कारण म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक गत दहा दिवसांपासून सुटीवर असून प्रभारी अधिकाऱ्याचे कुणावरही नियंत्रण दिसत नाही.