याप्रसंगी तहसीलदार मल्लिक विराणी, कृषिभूषण शेतकरी शेषराव निखाडे, मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, माजी सभापती खुशाल गिदमारे, ‘उमेद’च्या तालुका व्यवस्थापक सविता तिडके, परिसरातील गावांचे सरपंच कृषी विभागाचे व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
गिदमारे म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्पादनखर्च कमी करून नफा वाढविण्याकडे लक्ष पुरवावे. शेतीत नवनवे तंत्रज्ञान वापरून मनुष्यबळाचा वापर कमी करावा. १० टक्के खताची मात्रा कमी करून जमिनीची सुपीकता वाढविण्याकडे भर द्यावा. सेंद्रिय शेती साधण्याचा प्रयत्न करावा. रासायनिक कीटकनाशकांपेक्षा कृषी विभागाच्या सल्ल्याने पुरविण्यात आलेल्या जैविक कीटकनाशकांचा उपयोग करावा. निसर्गासोबत चालत नवनवे पीक उत्पादित करावे. नेहमी कृषी विभागाशी संलग्न राहत शेतीत नवी क्रांती शोधावी. माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शेतीदिनाचे आयोजन मौलिक आहे. आदी मार्मिक मार्गदर्शन पार पडले.
इसापूर येथील शेतकऱ्यांना कृषी कार्यालय, लाखनीअंतर्गत कृषी दिनाच्या निमित्ताने नवनव्या पिकांची व जमिनीच्या आरोग्याची माहिती मिळाली. बागायत शेतीचे अद्ययावत ज्ञान कृषी विभागामार्फत पुरविण्यात आले. कृषी विभागाच्या पुढाकारातून इसापूरवासीयांना कृषिक्षेत्रात नवी वाट मिळालेली आहे.