शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: October 12, 2015 01:11 IST

ऐतिहासिक स्वामी विवेकानंद वाचनालयाची इमारत नियमबाह्य लिलाव करून लिजवर (भाडेतत्वावर) देण्याची प्रक्रिया करणाऱ्या संबंधित तुमसर...

चौकशीची भाजपची मागणी : इमारत तोडफोड प्रकरणतुमसर : ऐतिहासिक स्वामी विवेकानंद वाचनालयाची इमारत नियमबाह्य लिलाव करून लिजवर (भाडेतत्वावर) देण्याची प्रक्रिया करणाऱ्या संबंधित तुमसर नगरपरिषद अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य तारिक कुरैशी तथा भाजयुमो जिल्हा महामंत्री अमित चौधरी यांनी नगरविकास मंत्री व नगरविकास प्रधान सचिवांकडे केली आहे.तुमसरातील बोस नगरात ऐतिहासीक स्वामी विवेकानंद वाचनालयाची इमारत असून तिच्यावर तुमसर नगरपरिषदेचा मालकी हक्क (१९४०) आहे. या इमारतीचा नियमबाह्य लिलाव करून लिजवर देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. येथे नियमबाह्य लिज संबंधी कारवाई केली आहे. येथे ऐतिहासिक इमारतीची तोडफोड करण्यात आली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ९२ (२), (३) चे उल्लंघन केलेले निदर्शनात आले आहे. येथे दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मो.तारिक कुरैशी तथा भाजयुमो जिल्हा महामंत्री अमित चौधरी यांनी केली आहे.नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी भंडारा यांना या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे.वाचनालयाचे प्रथम माळ्याचे जीर्ण असलेली इमारत किरकोळ दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असताना इमारतीची तोडफोड करण्यात आली. चटई क्षेत्रफळ ७५.४४ चौ.मी. आहे. येथे प्रती मासिक भाडे केवळ ५२१४ इतके ठेवण्यात आले. भर बाजारात ही जुनी ऐतिहासिक इमारत आहे. प्रथम माळ्यावरील वाचनालयाची जागा तीन वर्षाकरिता भाड्याने देण्यात आली. सध्या येथे इमारतीचे अवशेष शिल्लक आहे. इमारतीची तोडफोड कशी करण्यात आली असा प्रश्न कुरैशी यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. याप्रकरणामध्ये राज्य शासन काय करणार, अशी चर्चा शहरात चर्चीली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)