कम्युनिस्ट पक्षातर्फे नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:33+5:302021-08-24T04:39:33+5:30
साकोली येथील आठवडी बाजार सुरू करण्यात यावा, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत साकोली नगर परिषद कार्यक्षेत्रात मंजूर ६५ लाख रुपये ...

कम्युनिस्ट पक्षातर्फे नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
साकोली येथील आठवडी बाजार सुरू करण्यात यावा, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत साकोली नगर परिषद कार्यक्षेत्रात मंजूर ६५ लाख रुपये निधीची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर वाहतुकीला अडचण निर्माण होणे. साकोलीनगरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते झाले आहेत काही रुंद आहेत, काही अरुंद आहेत. असे निदर्शनास आले आहे की, जवळपास प्रत्येक रस्त्यावर म्हणजे सिमेंट रस्त्यावर चारचाकी, दोनचाकी गाड्या, कोणी कायमस्वरूपी ठेवतात, कोणी तात्पुरत्या ठेवतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. बहुतांश पथदिवे बंद आहेत. आवश्यक त्या ठिकाणी बोअरवेलची व्यवस्था करण्यात यावी. राष्ट्रीय महामार्ग ते नवीन तहसील कचेरी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गाचे काम त्वरित सुरू करावे, अशा विविध जन समस्यांना घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शिवकुमार गणवीर, दिलीप उंदीरवाडे, राजू बडोले, किशोर बारस्कर यांनी मुख्याधिकाऱ्यांना नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी पूर्वसूचनावजा निवेदन दिले.