मालेवार नगरवासियांनी जपली बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST2020-12-29T04:33:38+5:302020-12-29T04:33:38+5:30
भंडारा : मोलकरीण..कष्टकरी वर्ग..चार घरची धुणीभांडी करुन पोटाची खळगी भरणारी ही स्त्री.कधीच निवांतपणा नाही,उसंत नाही,सुट्टी मागीतली तरी ती मिळेलच ...

मालेवार नगरवासियांनी जपली बांधिलकी
भंडारा : मोलकरीण..कष्टकरी वर्ग..चार घरची धुणीभांडी करुन पोटाची खळगी भरणारी ही स्त्री.कधीच निवांतपणा नाही,उसंत नाही,सुट्टी मागीतली तरी ती मिळेलच याची शाश्वती नाही.कितीही विश्वासाने,प्रामाणिकपणे काम केले तरी तरी विश्वासार्हतेला तडे जाणारे प्रसंग घडणारच..कामात कुचराई झाली तर बोलणी ही बसणार..पण अशा घरकाम करणा-या कष्ट करुन संसाराचा गाडा ओढणा-या स्त्रियातही जानकाबाई उजवणे सारख्या सन्मानास पात्र महिला असतात.जानकाबाई ही घरोघर धुणीभांडी करणारी करणारी महिला.गत सतरा अठरा वर्षापासून मालेवार नगर व प्रगती कॅालनीत धुणीभांडी करतात.त्या साठ वर्षांच्या झाल्या याचे अौचित्य साधून मालेवार नगर वासियांनी सामाजिक बांधीलकी जपत त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले.आपल्यासाठी काम करणा-या कष्टकरी महिलेच्या जीवनात आनंदाचे चार क्षण आणावेत म्हणून अनेकांनी पैसे जमा केले.व शीवमंदीर परिसरात त्यांना साडीचोळीचा आहेर व मिठाई देऊन त्यांचा उचित सन्मान केला. ‘ये मेरे जींदगी का ये अनमोल पल है.ये पल मै कभी भूल नही सकती’ अशा शब्दात जानकाबाईंनी गहिवरलेल्या आवाजात स्वत:चे मत व्यक्त केले..
या मौलिक सोहळ्याचे आयोजन सेवानिवृत्त प्राचार्य लोकेश मोहबंसी,रक्षा मोहबंसी, पांडुरंग चोपकर, विनोद गालफाडे, संतोष मदनकर,दिपक चोपकर यांच्या सहयोगातून घडून आले.याप्रसंगी मालेवार नगरातील नागरिक उपस्थित होते. .बच्चे कंपनीने टाळ्या वाजवून या कल्पनेचे स्वागत केले.