शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

कामगारांनी आपल्या हक्काच्या रक्कमेची मागणी केली असता कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या काळात १६ सफाई कामगारांना कामावरून कमी केले. याबाबत शिवसेनेने पुढाकार घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया भंडारा यांना तक्रार दिली व पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देतुमसरातील प्रकार : १६ कंत्राटी कामगारांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराने सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले होते. त्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे निर्देश भंडारा सहायक कामगार आयुक्त उ. सु. लोया यांनी दिले आहेत.तुमसर नगरपरिषद अंतर्गत शहरातील घनकचरा संकलन करून त्याला डम्पिंग यार्डापर्यंत वाहतूक करण्याचे कंत्राट नागपूर जिल्ह्यातील शारदा महिला मंडळाला तीन वर्षांपासून दिले आहे. या कंत्राटदाराकडे ४० ते ५० सफाई कंत्राटी कामगार कामावर असताना महाराष्ट्र कामगार कायद्यानुसार न्यूनतम वेतन राशी देण्यात येत नव्हती.कामगारांनी आपल्या हक्काच्या रक्कमेची मागणी केली असता कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या काळात १६ सफाई कामगारांना कामावरून कमी केले. याबाबत शिवसेनेने पुढाकार घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया भंडारा यांना तक्रार दिली व पाठपुरावा केला होता.याची तातडीने दखल घेत सहायक कामगार आयुक्तांनी ९ जून रोजी त्यांच्या दालनामध्ये कंत्राटदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कामगार यांच्यात सामंजस्य घडवून आणण्याच्या दृष्टीने सुनावणी केली.यावेळी शिवसेनेचे दिनेश पांडे, अमित मेश्राम, जगदीश त्रिभुवनकर व माजी आमदार चरण वाघमारे यांनी कंत्राटी कामगारांवर अन्याय झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. यावर सहायक कामगार आयुक्तांनी कंत्राटदाराने कामावर असलेल्या कायद्यानुसार कामगारांच्या पूर्ण वेतन व भविष्य निर्वाह निधी आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगून सर्व अन्यायग्रस्त १६ कामगारांना त्वरित कामावर परत घेण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना कायदेशीर वेतन तरतूद करावी असेही निर्देश दिले. या सुनावणीला संबंधित कंत्राटदार गैरहजर होते. त्यामुळे सबब या प्रकरणाबाबत पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश सहायक कामगार आयुक्तांनी दिले. यावेळी सफाई कंत्राटी कामगार मारोती बर्वे, गोविंद भोंडेकर, कमल कनोजे, जितेंद्र भवसागर नागराज मेश्राम, संतोष भोडेकर, सदानंद बर्वे व नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी शैलेंद्र मोघरे उपस्थित होते. आयुक्तांच्या निर्देशाने कामागारांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी