बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान महायज्ञाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:48+5:302021-07-03T04:22:48+5:30
भंडारा : लोकमतचे संस्थापक-संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंती दिनानिमित्त आयोजित ‘लोकमत ...

बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान महायज्ञाला प्रारंभ
भंडारा : लोकमतचे संस्थापक-संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंती दिनानिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान महायज्ञाला शुभारंभ करण्यात आला. बाबूजींच्या स्मृती दिनानिमित्त राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून लोकमतच्या या मोहिमेत मोलाचा सहभाग नोंदविला.
मोहिमेचा शुभारंभ भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात करण्यात आला. श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण, दीपप्रज्वलन व फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन तुरस्कर, प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, प्रा. डॉ. कार्तिक पनिकर, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. राजेश कापगते, डॉ. वैशाली गोमकाळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मीरा सोनवने, हुसैन फिदवी, यशवंत सोनकुसरे, सुरेश राऊत, महेंद्र निंबार्ते, राजेश राऊत, आशिष दलाल, प्रवीण उदापुरे, भरत मल्होत्रा, कुणाल न्यायखोर, जॅकी रावलानी, दीप्ती भुरे, कविता लांजेवार, लोकमत जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी शशीकुमार वर्मा, जिल्हा कार्यालय प्रमुख मोहन धवड, प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, विनोद भगत, सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक ललित घाटबांधे आदी उपस्थित होते.
उपस्थित अतिथींनी रक्तदानाबाबत मोलाची माहिती देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. संचालन ललित घाटबांधे यांनी तर आभार प्रा. भोजराज श्रीरामे यांनी मानले. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मीरा सोनवणे, सीमा तिजारे, सुरेखा भिवगडे, विशाल गायकवाड, राजू नागदेवे, लोकेश गोटेफोडे, राहुल गिरी, मनीष दयाल, प्रिया मेश्राम, मयूर खोब्रागडे, पल्लवी अतकरी याशिवाय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भीमराव पवार, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. वीणा महाजन, प्रा. जितेंद्र किरसान, डॉ. रोमी बिष्ट आदींनी सहकार्य केले.
बॉक्स
रक्तदान करणारे रक्तदाते
‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत रक्तदान करणाऱ्यांमध्ये सतीश कोरे, योगेश जीभकाटे, निखिल खापर्डे, नीलिमा दास, पूजा पारस्कर, सिद्धांत गजभिये, मनोहर गभणे, प्रशांत भोले, राजन वलके, कैलास खोब्रागडे, राजकुमार लिंगायत, आदेश वैद्य, वैशाली गोमकाळे, हर्षा केवट, चंद्रप्रकाश तरारे, शरद भाजीपाले, चंद्रशेखर लिमजे, ज्ञानेश्वर खोब्रागडे, हर्षल मडामे, साहिल किंदर्ले, अकलेश काळबांधे, मुकेश मंत्री, अजय कारेमोरे, संचित निनावे, निष्ठा निनावे, रमेश चकोले, मंजूषा चव्हाण, उत्सव सक्सेना, राकेश शहारे, वसंता माटुरकर, मस्तानी मोहम्मद, गायत्री भुरे, फैजान खान, हुसैन फिदवी, इंद्रपाल कटकवार, संजय धकाते यांनी स्वेच्छेने रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपली.
कोट बॉक्स
लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती दिनानिमित्त लोकमत समूहातर्फे आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या निमित्ताने रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल. रक्तदान हे खरंच एखाद्याला जीवन देण्यासारखं अनन्यसाधारण कर्तव्य आहे. सेवाभाव जपणाऱ्या मोहिमेला माझ्या शुभेच्छा.
- सुनील मेंढे, खासदार.
कोट बॉक्स
लोकमतच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबविले जातात. माणूस जोडण्याची कला या संस्थेने चांगली जपली आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या माध्यमातून अधिकाधिक संबंध दृढ होतील. कोरोना महामारीने आपल्याला बरेच काही शिकविले. या रक्तदान मोहिमेतून संकलित केल्या जाणाऱ्या रक्त पिशवीतून अनेकांचे जीव वाचविले जातील, यात शंका नाही.
- नरेंद्र भोंडेकर, आमदार, भंडारा.
कोट बॉक्स
कोरोना महामारीच्या काळात रक्ताची अधिक गरज आहे. आपण औषधे, ऑक्सिजन उपलब्ध करू शकतो, मात्र रक्ताचे तसे नाही. म्हणून ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम खूप महत्त्वाची वाटते. उल्लेखनीय म्हणजे राज्यभरात ही मोहीम राबविली जाणार असल्याने विक्रमी रक्त पिशवी संकलनाची नोंद होईल, अशी मला आशा आहे. लोकमतने या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशा उपक्रमाची खऱ्या अर्थाने गरज आहे.
- संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा.
कोट बॉक्स
राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असतो. रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. अशा वेळी समस्या वाढत असते. रक्त मिळविण्यासाठी नातेवाइकांची धावपळ होत असते. अशा अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून केले जाणारे रक्त संकलन निश्चित रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल. रक्तदानाबाबत कुठलाही गैरसमज कोणीही करून घेऊ नये.
डॉ. रियाज फारुकी, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.
कोट बॉक्स
कोरोना संक्रमण काळात रक्ताची खूप गरज भासली. निरोगी आणि सुदृढ व्यक्तीला रक्तदान करता येते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण व आपली रोगप्रतिकार क्षमता उत्तम असल्यास रक्तदान करताना घाबरू नये. लोकमतच्या या उपक्रमामुळे रक्तदात्यांना जीवरक्षक बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
-डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष आयएमए, भंडारा.