धूळ साफ न करताच डांबरीकरणाचे काम
By Admin | Updated: November 30, 2014 23:00 IST2014-11-30T23:00:31+5:302014-11-30T23:00:31+5:30
तिड्डी ते मानेगाव रस्ता पूर्णपणे उखडला असून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु झाले आहे. मात्र संबंधित कंत्राटदार रस्त्यावरील धुळ साफ न करताच त्यावर डांबरीकरण करीत असल्याने ते निकृष्ट

धूळ साफ न करताच डांबरीकरणाचे काम
मानेगाव : तिड्डी ते मानेगाव रस्ता पूर्णपणे उखडला असून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु झाले आहे. मात्र संबंधित कंत्राटदार रस्त्यावरील धुळ साफ न करताच त्यावर डांबरीकरण करीत असल्याने ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे रस्ता काही दिवसातच उखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील अनेक वर्षांपासून हा मार्ग रहदारीयोग्य नव्हता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी तथा संबंधित विभागाकडे रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. नुकतेच या रस्त्याच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. खडीकरणाचे काम उखडले असतानाही रस्त्यावरील धुळ साफ न करता त्यावरच डांबरीकरण करीत असल्याने कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत आहे. डांबर टाकून त्यावर बारीक चुरी टाकण्यात येत असून रोडरोलरच्या माध्यमातून तिचे घोटाई करण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
संबंधित कंत्राटदाराला सदर काम योग्य प्रकारे करण्याच्या सूचना द्याव्या. जेणेकरून डांबरीकरणाच्या कामानंतर वाहतूक सुरु झाल्यावर काही दिवसातच हा मार्ग पुन्हा उखडणार नाही. बांधकाम विभागाने याची योग्य दखल घ्यावी. (वार्ताहर)