शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

समूह शेतीसाठी सकारात्मक विचाराने एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:41 PM

शेतीत नवीन प्रयोग करीत पीक पद्धत बदलविणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना मार्गदर्शन : पालांदूर येथील सभेत मंगेश घोळके यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतपालांदूर : शेतीत नवीन प्रयोग करीत पीक पद्धत बदलविणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनात व दर्जामध्ये सुधारणा व्हावी, याकरिता शेतकऱ्यांनी समूह पद्धतीने शेती करणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांनी केले.पालांदूर येथील ग्रामपंचायत सभागृहात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र कुरेकार, माजी सभापती दिलवर रामटेके, कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके, अनिल शहारे, कृषी सहाय्यक चुडाराम नंदनवार, श्रीकांत सपाटे, शिल्पा खंडाईत, विभा शिवणकर, व्ही.सी. गिऱ्हेपुंजे, पपीता टिचकुले, घनश्याम पाटील व मदन बोळणे उपस्थित होते. कृषीचे पदवीधर मदन बोळणे यांनी ठिबक व मल्चींगचे वैशिष्ट्ये समजावून सांगितले. घनश्याम पाटील यांनी देखभाल, दुरुस्ती नियोजन याविषयावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नांची सरबत्ती करीत उत्तर घेत समधानाने तात्काळ समूह / गट तयार करीत शासनाच्या हाकेला साथ दिली.नरव्हा, पाथरी, मºहेगाव, ढिवरखेडा, पालांदूर येथील शेतकºयांनी सहभाग घेतला होता. भाजीपाल्यातील विविध पिके घेत परिसरात समृद्धी व्हावी, याकरिता शेतकरी स्वत:च प्रामाणिकतेने सरसावलेला दिसत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातून उत्पादन, विक्री व व्यवस्थापनाचे धडे नियमित सुरु राहत शेतकºयांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडण्याचा मुख्य हेतू पुढे आला आहे.दामाजी खंडाईत यांनी कृषी अधिकाºयांना कार्यतत्पर होत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत नवनवीन तंत्रज्ञान पोहचविण्याचे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक अनिल शहारे यांनी किटकनाशक फवारणी करताना विशेष काळजी कशी घ्यायची याबाबद प्रात्यक्षिक दाखविले. कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके यांनी प्रगतशिल शेतकºयांना आश्वासीत करीत नियमित मार्गदर्शन देण्याचे मान्य करीत कृषीज्ञान तुमच्याकरिता समर्पीत असल्याचे सांगितले.संचालन कृषीसहाय्यक शिल्पा खंडाईत, श्रीकांत सपाटे तर आभार कृषीसहाय्यक विभा शिवणकर यांनी केले.