जिल्हाधिकाऱ्यांची पंचायत समितीला भेट
By Admin | Updated: February 26, 2015 00:21 IST2015-02-26T00:21:49+5:302015-02-26T00:21:49+5:30
पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या कामात आॅनलाईन गैरव्यवहार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास सुरु असला तरी तत्कालीन कर्मचारी उसगावकर हा अजूनही पोलिसांना गवसला नाही.

जिल्हाधिकाऱ्यांची पंचायत समितीला भेट
साकोली : पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या कामात आॅनलाईन गैरव्यवहार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास सुरु असला तरी तत्कालीन कर्मचारी उसगावकर हा अजूनही पोलिसांना गवसला नाही. आज जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन रोजगार हमी योजना विभागाची पाहणी केली. नवे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून हिमालय मेश्राम यांची नियुक्ती केली.
गैरव्यवहाराची तक्रार होऊन तब्बल एक आठवडा लोटला असला तरी या गैरव्यवहारातील तत्कालीन कर्मचारी ऊसगावकर हा अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अपुर्णच असून या गैरव्यवहारात अजून किती रुपयाचा गैरव्यवहार झाला हे निश्चित सांगताच येत नाही.
पोलीस ठाणे येथे पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्याचे काम सुरु असले तरी या तपासाला अजूनही वेग आलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)