जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड सेंटरचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:58+5:30
भंडारा शहरासह ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या असून वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह या मिशनसोबतच मृत्यु संख्या आटोक्यात ठेवण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. काँटेक्ट ट्रेसिंगवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड सेंटरचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना प्रार्दुभावाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या उपाय योजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भंडारा शहरासह ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या असून वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह या मिशनसोबतच मृत्यु संख्या आटोक्यात ठेवण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. काँटेक्ट ट्रेसिंगवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. मोठया प्रमाणात संपर्क शोध केल्यास प्रार्दुभाव कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. या बैठकीत जिल्हयात वृध्द असलेल्या शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड्सचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार केल्यास व मास्कचा वापर केल्यास कोरोना संसगार्पासून बचाव शक्य आहे, असे ते म्हणाले. आवश्यकता नसतांना प्रवास करण्याचे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांची कोविड केअर सेंटरला भेट
शहापूर जवळील राजेदहेगाव येथे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह इमारतीत असलेल्या कोविड केअर सेंटरला गुरुवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट दिली. यावेळी त्यांचेसोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते उपस्थित होते. सुरक्षित अंतर राखून जिल्हाधिकाºयांनी रुग्णांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोविड केअर सेंटरमध्ये सॅनिटायझर, पिण्याचे गरम पाणी आदी सुविधा पुरविण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या. कोरोना आजाराला न घाबरता काळजी घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योगा करण्याचा सल्ला जिल्हाधिकाºयांनी दिला. कुठलीही अडचण आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.