पालांदूर नवजात बालकांना सामूहिक श्रद्धांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:20+5:302021-01-13T05:33:20+5:30

पालांदूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवात मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांना पालांदूर येथील बाजार चौकात जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने ...

Collective tribute to Palandur newborns! | पालांदूर नवजात बालकांना सामूहिक श्रद्धांजली !

पालांदूर नवजात बालकांना सामूहिक श्रद्धांजली !

पालांदूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवात मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांना पालांदूर येथील बाजार चौकात जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील मान्यवर मंडळीत ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, तु.रा. भुसारी गुरुजी, सरपंच पंकज रामटेके, केवळराम कापसे गुरुजी, आयोजक जि.प.चे माजी सदस्य भरत खंडाईत, डॉ.अभय पालांदूरकर, डॉ. प्रमोद जवंजाळ, सरपंच प्रशांत मासुरकर (मांगली), प्रा. भोजराज नगरकर, धनंजय दोनोडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे, माजी सरपंच वैशाली खंडाईत, डॉ. पल्लवी खंडाईत, डॉ. आशिष गभने तथा गावकरी मंडळी उपस्थित होते.

यावेळी मंडळींनी आपल्या भावना व्यक्त करीत झालेल्या चुका पुन्हा घडू नयेत. याकरिता शासन प्रशासना स्तरावरून विशेष लक्ष पुरवावे. दोषींवर निश्चितच कारवाई व्हावी. या नवजात शिशुला ईश्वर चिरशांती देवो, त्या कुटुंबांना दुःख पचविण्याचे सामर्थ ईश्वर प्रदान करो, अशी प्रार्थना करण्यात आली. संचालन संगीत शिक्षक भास्कर पिंपळे (गुरुजी) यांनी केले.

Web Title: Collective tribute to Palandur newborns!