मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना कागदावरच

By Admin | Updated: May 1, 2017 00:24 IST2017-05-01T00:24:51+5:302017-05-01T00:24:51+5:30

चिचाळ येथील पाणी पुरवठा करणारी जवाहर योजनेतील सन १९८४ मधील पाईल पाईन जिर्ण झाल्याने जलकुंभात पाण्याची साठवणुक होत नाही.

CM Water Supply Scheme on Paper | मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना कागदावरच

मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना कागदावरच

चिचाळात पाणी समस्या पेटणार : जुनी नळ योजना कालबाह्य, जीवन प्राधिकरण योजनेला अपयश
प्रकाश हातेल चिचाळ
चिचाळ येथील पाणी पुरवठा करणारी जवाहर योजनेतील सन १९८४ मधील पाईल पाईन जिर्ण झाल्याने जलकुंभात पाण्याची साठवणुक होत नाही. पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने ११ गावाला जीवन प्राधीकरण योजनेंतर्गत पाणी पुरवठा करणारी योजना अपयशी ठरल्याने जलकुंभ शोभेचे वास्तू म्हणून उभे आहेत. १२ महिन्यापूर्वी गावाला शासनाची मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर असुनही कागदावरच असल्याने या वर्षाला पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र जिवन प्राधीकरण विभागाच्या हलगर्जीपणा व लोकप्रतिनिधीच्या उदासिन धोरणामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत ११ गावांना पाणी पुरवठा करणारी योजना अपयशी ठरल्याने पवनी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा सर्वात जास्त फटका चिचाळ गावाला बसला आहे. जिवन प्राधीकरणच्या माध्यमातून चिचाळ, आकोट, कोंढा कोसरा, ब्राम्हणी, शिवनाळा, जुनोना, भेंडाळा, मांगली, वलनी व कुर्झा या ११ गावांना पाणी पुरवठा करणारी योजना यंदाही अपयशी ठरल्याने ती योजना थंडबस्त्यात पडली आहे. सध्या भूजलस्तर खालावल्याने विहिरी बोरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.
पवनी तालुक्यातील ग्राम चिचाळ येथे जीवन प्राधिकरण योजनेतील २ लाख लिटर पाण्याची टाकी मागील १५ वर्षापासून उभी असून यंदा वर्षालाही ती कोरडीच राहिल्याने चिचाळ ग्रामवासीयांना जवाहर योजनेतील जुनी ६५ हजार लिटरची पाण्याची टाकीच पाणी पुरवठा करीत आहे. चिचाळ येथील साधन सामुग्री अल्पशी असल्याने पाण्याची समस्याग्रस्त नागरिकांना दहाही दिशा भटकंती करावी लागत आहे.
ग्राम चिचाळ येथे शेत शिवारात ८१ विहिरी गावात ५९ खाजगी विहिरी २५ बोरवेल द्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने नळ योजनेचे पाणी पुरवठा दिवसातून एकदाच केल्या जातो. सदर गावाला जीवन प्राधिकरणाचे मोठे जलकुंभ उभे असून कोरडेच आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतने जलकुंभाशेजारी बोरवेल मारुन पाणी साठविले जाते. मात्र गावातील जिर्ण पाईप लाईन ने ग्रामस्थांना पाण्याचा लाभ घेता येत नाही. सदर गावाला भिषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नळाचे पाणी १५ ते २० मिनिटे मिळते. त्यामुळे येथील काही धनाढ्य श्रीमंतानी पाण्याची समस्या भेडसावू नये म्हणून टिल्लू पंप खरेदी करुन घरगुती कनेक्शनवर लावले आहेत. त्यामुळे त्यांना पाणी जास्त प्रमाणात मिळते.
पंपाच्या माध्यमातून पाणी ओढले जात असल्याने सखल भागात २४ तास नळात पाणी राहायचे. आता काही वेळापुरतेच पाणी राहते. सदर प्रकरणासंदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायतला तक्रारी केल्या ग्रामपंचायतने धाडी मारल्या मात्र काही दिवस बंद केल्या जाता व पूर्वत जैसे थे स्थिती होत आहे.
सदर गावाला पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. येथे मुख्यमंत्री पेयजल योजना ६० लक्ष रुपयांची मंजूर असून या योजनेला प्रत्येक कार्यक्रमात लोकप्रतिनिधीनी मी आणल्याचे श्रेय लाटून घेतले मात्र वर्ष लोटूनही ही योजना चिचाळ ग्रामस्थांना पाणी पाजण्यास अपयशी ठरल्याने चिचाळ ग्रामपंचायतने मुख्यमंत्री यांना निवेदन देवून ती योजना तात्काळ चालू करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

सन १९८४ मधील पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन जिर्ण झाली तर जीवन प्राधीकरण पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याने गावाला पाणी समस्येचा सामना करावा लागतो. मात्र मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर असून ती योजना पुर्णत्वास गेल्यास पाणी समस्या मिटेल.
उषा काटेखाये
सरपंचा, ग्रामपंचायत चिचाळ

Web Title: CM Water Supply Scheme on Paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.