दातांची स्वच्छता निरोगी शरीराचे प्रथम पाऊल

By Admin | Updated: March 14, 2015 00:50 IST2015-03-14T00:50:08+5:302015-03-14T00:50:08+5:30

फॅशन म्हणून पोटात जाणारे पदार्थ हे शरीरातील इतर अवयावर प्रभाव टाकतात. मुलांची हौस भागवण्याकरीता किंवा फॅशन म्हणून पालकांनी ...

Cleanliness of teeth is the first step of healthy body | दातांची स्वच्छता निरोगी शरीराचे प्रथम पाऊल

दातांची स्वच्छता निरोगी शरीराचे प्रथम पाऊल

वरठी : फॅशन म्हणून पोटात जाणारे पदार्थ हे शरीरातील इतर अवयावर प्रभाव टाकतात. मुलांची हौस भागवण्याकरीता किंवा फॅशन म्हणून पालकांनी मुलांना खाऊ घालणाऱ्या फास्ट फुडवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
लहान वयात मुलाचे दात म्हातारपणातील दातासारखे दिसतात. दात हे निसर्गाचे अदभुत देण आहे अनैसर्गिक दात शोभा देवू शकतात. पण दाताचे खरे काम करू शकत नाही. म्हणून प्रत्येकानी दातांची काळजी घ्यावे. नियमित तज्ज्ञाचा सल्ला व दातांची स्वच्छता याशिवाय अन्य उपाय नाही, असे प्रतिपादन दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉ. मुकेश तोमर यांनी केले.
तथागत पब्लिक स्कुल वरठी येथे बालकांचे दात व घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. मुकेश तोमर व डॉ. सागर गणवीर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करून औषधपचार आणि नैसर्गिक दाताचे आयुष्य कंस वाढते व कमी होते यांचे प्रात्यक्षिक करून दाखवते. लहान वयात व वयस्कानी विशेषत: काळजी घेतल्यास दाताचे वयमर्यादा वाढविता येते असे समजावून सांगितले. याकरीता त्यांनी विद्यार्थ्याकडून घरी दात स्वच्छ करण्याचे तंत्र सराव करून घेतले.
दंत रोग तज्ज्ञ डॉ. सागर गणवीर यांनी जेवणानंतर व पुर्वी दाताची काळजी घेतल्यास विविध आजारापासून मुक्त राहता येते, असे सांगितले. दात स्वच्छ व निरोगी राहल्यास पोटात जंतु निर्माण होत नाही, असे सांगितले.
दंत रोड तज्ज्ञ डॉ. मुकेश तोमर यांनी शाळेतील विद्यार्थी व पालकांचे दाताची तपासणी केली. प्रत्येकांना टुथ पेष्ट व दुथ ब्रस वाटप करण्यात आले. २७५ जणाची तपासणी झाली. यावेळी दातांना ब्रश कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. त्यांनी आणलेले कृत्रिम दात व चार्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य तथागत मेश्राम व प्रमुख पाहुणे प्रा. विद्या मेश्राम, निशांत लिंग, राजेश गजभिये, विकास गलबले, रमेश देवगडे उपस्थित होते.
संचालन वंदना साहनी व आभार दीपक कवरे यांनी मानले. कार्यक्रमास सिमा डोंगरे, बबिता रहांगडाले, संध्या मेश्राम, दिपीका मारवाडे, शिरीष गाढवे, माया वांद्रे, कुंता लोहबरे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Cleanliness of teeth is the first step of healthy body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.