कोरोना चाचणीसाठी नागरिकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:02+5:302021-04-23T04:38:02+5:30

जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून अनेकांच्या मनात कोरोनाबाबत शंका-कुशंका येतात. सर्दी, खोकला आणि ताप आला की आपल्याला कोरोना तर ...

Citizens exercise for corona testing | कोरोना चाचणीसाठी नागरिकांची कसरत

कोरोना चाचणीसाठी नागरिकांची कसरत

जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून अनेकांच्या मनात कोरोनाबाबत शंका-कुशंका येतात. सर्दी, खोकला आणि ताप आला की आपल्याला कोरोना तर झाला नाही ना अशी मनात भीती निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकजण आपली चाचणी करून घेण्यासाठी कोविड केंद्रावर पोहोचतात; परंतु गत आठ दिवसांपासून या ठिकाणी रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. बहुतांश ठिकाणी केवळ ॲन्टिजेन चाचणीच केली जाते. आरटीपीसीआरसाठी आग्रह केला तरीही ही चाचणी होत नाही. भंडारा शहराची ही अवस्था आहे, तर ग्रामीण भागातील कोविड केअर केंद्रावरील चाचणीची काय अवस्था असेल याचा विचार न केलेलाच बरा. अनेकदा कोरोना चाचणीसाठी नागरिक रांगेत उभारतात; परंतु काही वेळातच किट संपली, आता उद्या या असे उत्तर दिले जाते. नेमके काय प्रकरण आहे. कोरोना चाचण्या कमी तर केल्या जात नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Citizens exercise for corona testing