चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस दादांना बांधली राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST2021-08-23T04:37:46+5:302021-08-23T04:37:46+5:30

रविवारी राखीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक राजकुमार गभने, विज्ञान शिक्षक पंकज बोरकर यांना दोन दिवसापूर्वीच तुमसर येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी ...

The Chimukalya students tied up the police grandfather | चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस दादांना बांधली राखी

चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस दादांना बांधली राखी

रविवारी राखीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक राजकुमार गभने, विज्ञान शिक्षक पंकज बोरकर यांना दोन दिवसापूर्वीच तुमसर येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधण्याच्या मानस व्यक्त केला. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यास होकार दिला. शाळेतील विद्यार्थिनी अंजली गहाने ,युक्तिका हेडाऊ , वेदांती लुटे , डिंपल नागपुरे , कनक कारेमोरे या विद्यार्थिनींनी स्वयं हस्तकलेने तयार केलेल्या राख्या पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, पोलीस उपनिरीक्षक औताडे, पोहवा चिंचखेडे, रहांगडाले तांडेकर , हनवते इत्यादी कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या व सर्वांना मिठाई दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार गभने, विज्ञान शिक्षक पंकज बोरकर , नगरसेवक सुनील पारधी, उडान संस्थेच्या संस्थापिका कल्यानीताई भुरे, शिक्षक वृंद अरामे ,लीना मत , नंदकिशोर उके , प्रदीप वासनिक , मनीष साठवणे ,अशोक लूटे आणि दिलीप बुरडे उपस्थित होते.

Web Title: The Chimukalya students tied up the police grandfather