जिल्ह्यात हजारोच्या संख्येत बालमजूर

By Admin | Updated: June 13, 2015 00:44 IST2015-06-13T00:44:11+5:302015-06-13T00:44:11+5:30

खेळण्या-बागडण्याच्या वयात मजुरी करण्यासाठी प्रवृत्त होणे, ही एक मोठीच सामाजिक विटंबना आहे.

Child labor in thousands in the district | जिल्ह्यात हजारोच्या संख्येत बालमजूर

जिल्ह्यात हजारोच्या संख्येत बालमजूर

सामाजिक कलंक : विभागाकडे केवळ १९६ बालमजुरांची नोंद
गोंदिया : खेळण्या-बागडण्याच्या वयात मजुरी करण्यासाठी प्रवृत्त होणे, ही एक मोठीच सामाजिक विटंबना आहे. बालमजुरीचा हा अभिशाप शहरांसह आता ग्रामीण भागातही पसरून बालकांचे बालपणच हिरावून घेत आहे. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत बालमजूर असून संबंधित विभागाकडे केवळ १९६ बालमजुरांचीच नोंद असणे ही एक शोकांतिका ठरत आहे.
बाल मजूर हा त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नात एक लहानसा स्त्रोत असतो, तरीसुद्धा गरीब कुटूंब आपल्या बालकांचे भविष्य त्यामुळे अंधारात झोकतात. खेळण्या-बागडण्याचे व शिक्षणाचे दिवस जबाबदारीत परिवर्तीत होतात. कुटुंबाचे दायित्व खांद्यावर येते व तो सामाजिक बंधनात बांधला जातो. तेव्हा ‘बालपण हे सुखाचे दिवस’ या वाक्याचा नेहमी होणाऱ्या उपयोगाची सत्यता दिसून पडते. खरोखरच बालपण हे सुखाचे असते, पण कुणासाठी? गोरगरिबांची मुले तर बाल मजुरीतच आपले कष्टकारक जीवन जगत असतात.
या बालकांमध्ये मोठी हिंमत व धाडस असते, पण त्यांना शिक्षणाची नितांत गरज असते. त्यासाठी पैसा हवा असतो. मात्र उदरनिर्वाहासाठीच पैसा नाही तर शिक्षणासाठी तरी कुठून आणणार? ही समस्या गरीब कुटुंबासमोर व बालकांच्या पालकांसमोर आवासून उभी असते. आता गरज आहे बाल कामगारांच्या जीवनात नवीन प्रकाशवाट आणण्याची. त्यासाठी शासकीय, अशासकीय संघटना व समाजाने पुढे येवून कार्य करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Child labor in thousands in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.