नगराध्यक्षांची निवडणूक ५ रोजी
By Admin | Updated: July 29, 2014 23:38 IST2014-07-29T23:38:33+5:302014-07-29T23:38:33+5:30
पूर्व विदर्भातील नऊ नगर पालिकांमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून भंडारा पालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक दि. ५ आॅगस्ट रोजी आहे. विद्यमान नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा

नगराध्यक्षांची निवडणूक ५ रोजी
चढाओढ सुरू : खुला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद
भंडारा : पूर्व विदर्भातील नऊ नगर पालिकांमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून भंडारा पालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक दि. ५ आॅगस्ट रोजी आहे. विद्यमान नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ ६ आॅगस्ट रोजी संपत आहे. पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष व उपाध्यक्षपाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे नजरा लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुकीत अध्यक्षपद आरक्षणांतर्गत खुला असा आहे. निवडणुकीसाठी पालिका सभागृहात दि. ५ रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष सभा होईल. उपविभागीय अधिकारी रविंद्र कुंभारे हे पिठासीन अधिकारी म्हणून राहतील. अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दि. १ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी व पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची यादी त्याच दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात येणार आहे. याचवेळी इच्छूक असलेले उमेदवार अपीलसुद्धा करू शकतील. दि. ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ वाजतापर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेऊ श्कतील.
दि. ५ रोजी सभा सुरु झाल्यावर पिठासीन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची व उमेदवारी मागे घेतलेल्यांची नावे वाचून दाखवतील. त्यानंतर मतदानाला प्रारंभ होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी दोन गटात रस्सीखेच असून राजकीय वातावरण तापलेले आहे. सध्या नगरपालिकेसह शहरात आगामी निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. (प्रतिनिधी)