मुख्याध्यापकाला हटविण्यासाठी चिचाळ ग्रामवासीयांचा एल्गार

By Admin | Updated: July 21, 2014 00:01 IST2014-07-21T00:01:21+5:302014-07-21T00:01:21+5:30

जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चिचाळ शाळेतील इयत्ता ९ वीमधील विद्यार्थी रोहित सुधाकर मांडवकर (१४) या विद्यार्थ्यांच्या कानावर प्राचार्य लांडगे यांनी दारुच्या नशेत थापड मारली.

Chhalal village residents to remove headmistress Elgar | मुख्याध्यापकाला हटविण्यासाठी चिचाळ ग्रामवासीयांचा एल्गार

मुख्याध्यापकाला हटविण्यासाठी चिचाळ ग्रामवासीयांचा एल्गार

चिचाळ : जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चिचाळ शाळेतील इयत्ता ९ वीमधील विद्यार्थी रोहित सुधाकर मांडवकर (१४) या विद्यार्थ्यांच्या कानावर प्राचार्य लांडगे यांनी दारुच्या नशेत थापड मारली. याची तक्रार पोलीस स्टेशन अड्याळला केली. रोहितला उच्च तपासणीसाठी भंडारा येथे हलविण्यात आले. सदर मुख्याध्यापकाने तीन महिन्याची मेडीकल रजा घेतली असून तपास ठाणेदार डांगे, पोलीस हवालदार संजय पाटील करीत आहेत.
पवनी तालुक्यातील चिचाळ जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य विमल चाचरकर यांची तुमसर तालुक्यात नाकाडोंगरी येथे बदली झाली. त्यांच्याव्यतिरिक्त जागी ३१ मार्च २०१३ ला करडी येथून सुंदरलाल लांडगे शिक्षकांची पदोन्नती होत प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. मात्र सदर शिक्षक मद्यप्राशन करीत असल्याने कधीच शाळेत वेळेवर हजर राहत नव्हते. शाळा शिक्षण समिती व ग्रामस्थांनी व पालकांनी अनेकदा वरिष्ठांना अनेकदा लेखी तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र सदर शिक्षकात काहीच सुधारणा झाली नाही. शाळेतील येणारा निधी यांची नियोजन करीत नसल्याचे अनेक निधी शासनाला प्राचार्य यांचे निष्काळजी धोरणामुळे पर गेल्याचे आज शाळेला गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके, विस्तार अधिकारी के.डी. भुरे, सपरंच उषा काटेखाये यांची चौकशी अंती लक्षात आले.
सदर शिक्षक हा नेहमीच दारु पिऊन शाळेत राहत असून शाळेतही दारु पित असल्याचे कित्येक ग्रामस्थांनी त्यांना पकडले आहे. मात्र त्यांचे मध्ये सुधारणा होईल म्हणून ग्रामस्थ १२ महिने गप्प राहिले. मात्र काल दि. १८ जुलैला इयत्ता नववीतील विद्यार्थी रोहित सुधाकर मांडवकार या विद्यार्थ्यांला शारीरिक शिक्षण तासीकेदरम्यान मुख्याध्यापक यांनी दारुच्या नशेत कानावर थापड मारल्याची तक्रार पोलिसात केली. सदर घटनेची सूचना शिक्षण विभागाला देण्यात आली. शाळेला गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके, विस्तार अधिकारी के.डी. भुरे, ठाणेदार डांगे, संजय पाटील, सरपंचा उषा काटेखाये, मनोज वैरागडे, उपसभापती शिवा मुंगाटे, उपसरपंच दिलीप रामटेके, पो.पा. तुकेश वैरागडे, क्रिष्णा काटेखाये आदींनी भेट दिली असता शाळेला शिक्षक शाळेत १०.३० वाजता दारुच्या नशेत शाळेत आले. तर संगणक कक्षात चौकशीदरम्यान दारुचे पव्वे मिळाले.
शाळेत गावातील बहुसंख्येत पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेत सरपंच उषा काटेखाये, मनोज वैरागडे,जगतराम गभणे, भैय्या घोडके, देवनाथ वैद्य, ईश्वर वैद्य, क्रिष्णा काटेखाये, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी सरपंचा व ग्रामस्थांनी सदर शिक्षक सोमवारला शाळेत आला तर शाळेला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला. मुख्याध्यापकाला तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सरपंच यांनी केला. मुख्याध्यापकांना तीन महिन्यांची वैद्यकीय रजा घेतली असून तीन महिन्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांसमोर दिले. (वार्ताहर)

Web Title: Chhalal village residents to remove headmistress Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.