शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

जवाहरनगर-ठाणा रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:26 AM

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला कर्तव्यावर जा-ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला कर्तव्यावर जा-ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.आयुध निर्माणी भंडारा येथील कारखान्यात राष्ट्रीय महामार्ग सहा ठाणा टी-पार्इंटपासून ते कारखान्यापर्यंत पाच किलोमीटरचा रस्ता आहे. येथील कर्मचारी, शाळकरी, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, व्यापारी या रस्त्याचा वापर करीत असतात. या मार्गाने जड वाहतूक नियमित होत असतो. सुमारे तीन महिन्यापूर्वी जुना चेक पोष्ट विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१९ पर्यंत काही प्रमाणात रस्त्याची डागडुजी करीता कंत्राट देवून दुरूस्ती करण्यात आली. आजघडीला या रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले आहे.या रस्त्यावरून कर्मचारी व शाळकरी विद्यार्थी दुचाकी व सायकलद्वारे प्रवास करताना अनेक अडचणीवर मात करून वाहन चालवावे लागत आहे. रात्री अपरात्री विद्युत पथदिवे बंद असताना मार्ग निट समजत नाही. खोल खड्ड्यांमुळे वाहन चालक रस्त्यात पडण्याचे प्रकार घडत आहे. परिणामी मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. येथील कार्यरत कामगार संघटनांचे कर्मचाºयांच्या जिवावर बेतणाºया रस्त्याकडे दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे जाब विचारून दुरूस्तीसाठी दुर्लक्ष करीत असल्याचे समजते.एखादा मोठा उपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल काय, असा सवाल आहे. विद्यार्थ्यांच्या व कर्मचाºयांच्या हितार्थ या रस्त्यांची नव्याने बांधणी संंबंधित वरिष्ठ विभागाने करण्याची नितांत गरज आहे.