जवाहरनगर-ठाणा रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:27 IST2019-04-27T00:26:52+5:302019-04-27T00:27:48+5:30
आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला कर्तव्यावर जा-ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

जवाहरनगर-ठाणा रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली चाळण
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला कर्तव्यावर जा-ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
आयुध निर्माणी भंडारा येथील कारखान्यात राष्ट्रीय महामार्ग सहा ठाणा टी-पार्इंटपासून ते कारखान्यापर्यंत पाच किलोमीटरचा रस्ता आहे. येथील कर्मचारी, शाळकरी, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, व्यापारी या रस्त्याचा वापर करीत असतात. या मार्गाने जड वाहतूक नियमित होत असतो. सुमारे तीन महिन्यापूर्वी जुना चेक पोष्ट विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१९ पर्यंत काही प्रमाणात रस्त्याची डागडुजी करीता कंत्राट देवून दुरूस्ती करण्यात आली. आजघडीला या रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले आहे.
या रस्त्यावरून कर्मचारी व शाळकरी विद्यार्थी दुचाकी व सायकलद्वारे प्रवास करताना अनेक अडचणीवर मात करून वाहन चालवावे लागत आहे. रात्री अपरात्री विद्युत पथदिवे बंद असताना मार्ग निट समजत नाही. खोल खड्ड्यांमुळे वाहन चालक रस्त्यात पडण्याचे प्रकार घडत आहे. परिणामी मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. येथील कार्यरत कामगार संघटनांचे कर्मचाºयांच्या जिवावर बेतणाºया रस्त्याकडे दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे जाब विचारून दुरूस्तीसाठी दुर्लक्ष करीत असल्याचे समजते.
एखादा मोठा उपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल काय, असा सवाल आहे. विद्यार्थ्यांच्या व कर्मचाºयांच्या हितार्थ या रस्त्यांची नव्याने बांधणी संंबंधित वरिष्ठ विभागाने करण्याची नितांत गरज आहे.