शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीचा कारभार प्रभारी तहसीलदारावर

By admin | Updated: January 7, 2016 01:12 IST

तहसिल कार्यालय मोहाडी येथे दोन नायब तहसीलदार व एक तहसीलदार अशा तीन अधिकाऱ्यांची जागा असताना येथे केवळ एकच प्रभारी तहसीलदार आहेत.

कामांचा खोळंबा : तहसीलदारांची बदलीसिराज शेख  मोहाडीतहसिल कार्यालय मोहाडी येथे दोन नायब तहसीलदार व एक तहसीलदार अशा तीन अधिकाऱ्यांची जागा असताना येथे केवळ एकच प्रभारी तहसीलदार आहेत. त्यांना वारंवार सभांकरीता जाणे होत असल्याने मोहाडी तहसील कार्यालय नावापुरतेच राहलेले आहे. मात्र यामुळे जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.या बाबतचे वृत्त तीन जानेवारीला 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने तहसीलदार जयंत पोहनकर यांच्या ठिकाणी येथीलच नायब तहसीलदार एच.एम. धोटे यांच्याकडे प्रभारी तहसीलदारांचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र नियमित तहसीलदार देण्यात आले नाही. दुसरे म्हणजे येथीलच नायब तहसीलदार १७ डिसेंबरपासून रजेवर गेलेले आहेत ते अजुनपर्यंत रूजु झालेले नाही. त्यामुळे तीन तहसीलदारांचा कार्य एकाच प्रभारी तहसीलदारांवर येवून ठेपला आहे. मात्र त्यांनाही वारंवार उपविभागीय अधिकारी तुमसर किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे सभांसाठी जावे लागते, अशा स्थितीत येथे तहसील कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित राहत नसल्याने सामान्य जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेवून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जयंत पोहणकर यांना मोहाडी येथून तहसीलदारांच्या जागेवरून परत बोलावून येथीलच नायब तहसीलदार थोटे यांना पदभार दिला. तुमसर तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार गौड यांना मोहाडी तहसील कार्यालयात काही दिवसांकरीता प्रभारावर पाठविण्याचा आदेश काढला. वृत्त लिहेपर्यंत ते मोहाडी तहसील कार्यालयात रूजु झालेले नव्हते. मात्र अधिकाऱ्याविना असलेल्या मोहाडी तहसील कार्यालयाची दैनावस्था पाहण्याजोगी आहे. मोहाडी तालुक्यातील नागरिकांचा थेट संबंध पंचायत समितीशी येतो. गावविकासासाठी गावातील नागरिक व लोकप्रतिनिधी नेहमी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येत असतात.