कामांचा खोळंबा : तहसीलदारांची बदलीसिराज शेख मोहाडीतहसिल कार्यालय मोहाडी येथे दोन नायब तहसीलदार व एक तहसीलदार अशा तीन अधिकाऱ्यांची जागा असताना येथे केवळ एकच प्रभारी तहसीलदार आहेत. त्यांना वारंवार सभांकरीता जाणे होत असल्याने मोहाडी तहसील कार्यालय नावापुरतेच राहलेले आहे. मात्र यामुळे जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.या बाबतचे वृत्त तीन जानेवारीला 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने तहसीलदार जयंत पोहनकर यांच्या ठिकाणी येथीलच नायब तहसीलदार एच.एम. धोटे यांच्याकडे प्रभारी तहसीलदारांचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र नियमित तहसीलदार देण्यात आले नाही. दुसरे म्हणजे येथीलच नायब तहसीलदार १७ डिसेंबरपासून रजेवर गेलेले आहेत ते अजुनपर्यंत रूजु झालेले नाही. त्यामुळे तीन तहसीलदारांचा कार्य एकाच प्रभारी तहसीलदारांवर येवून ठेपला आहे. मात्र त्यांनाही वारंवार उपविभागीय अधिकारी तुमसर किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे सभांसाठी जावे लागते, अशा स्थितीत येथे तहसील कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित राहत नसल्याने सामान्य जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेवून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जयंत पोहणकर यांना मोहाडी येथून तहसीलदारांच्या जागेवरून परत बोलावून येथीलच नायब तहसीलदार थोटे यांना पदभार दिला. तुमसर तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार गौड यांना मोहाडी तहसील कार्यालयात काही दिवसांकरीता प्रभारावर पाठविण्याचा आदेश काढला. वृत्त लिहेपर्यंत ते मोहाडी तहसील कार्यालयात रूजु झालेले नव्हते. मात्र अधिकाऱ्याविना असलेल्या मोहाडी तहसील कार्यालयाची दैनावस्था पाहण्याजोगी आहे. मोहाडी तालुक्यातील नागरिकांचा थेट संबंध पंचायत समितीशी येतो. गावविकासासाठी गावातील नागरिक व लोकप्रतिनिधी नेहमी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येत असतात.
मोहाडीचा कारभार प्रभारी तहसीलदारावर
By admin | Updated: January 7, 2016 01:12 IST