महिलांच्या प्रगतीसाठी मानसिकता बदलवा

By Admin | Updated: March 11, 2015 00:47 IST2015-03-11T00:47:55+5:302015-03-11T00:47:55+5:30

एक चांगल्या स्त्रीमुळे चांगले कुटुंब तयार होते. चांगल्या कुटुंबामुळे चांगला समाज तयार होतो. स्त्रीयांच्या प्रगतीसाठी पुरुषांप्रमाणे स्त्रीयांनीही मानसिकता बदलविली पाहिजे, ....

Change the mindset for women's progress | महिलांच्या प्रगतीसाठी मानसिकता बदलवा

महिलांच्या प्रगतीसाठी मानसिकता बदलवा

भंडारा : एक चांगल्या स्त्रीमुळे चांगले कुटुंब तयार होते. चांगल्या कुटुंबामुळे चांगला समाज तयार होतो. स्त्रीयांच्या प्रगतीसाठी पुरुषांप्रमाणे स्त्रीयांनीही मानसिकता बदलविली पाहिजे, तसेच आपल्या समाजातील स्त्रीभृण हत्या थांबविली नाही तर स्त्रीयांचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी केले.
भंडारा जिल्हा पोलिस मुख्यालय येथील बहुउद्देशिय सभागृह येथे रविवारी पोलिस अधिक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अप्पर पोलिस अधिक्षक कल्पना बारवकर होत्या. तर प्रमुख पाहुणे व वक्ते प्रिया शहारे, डॉ. नितीन तुरस्कर, मृणाल मुनीश्वर, मनिषा आंबेडारे, सुवर्णा धानकुटे, अंजू धरमशी, लिला खोना उपस्थित होते.
कल्पना बारवकर यांनी महिला अत्याचार विषयक विविध कायदयांची माहिती विविध उदाहरणाद्वारे उपस्थितांनी सांगितली.
प्रिया शहारे यांनी महिलांची मानसिकता ही रूढी, संस्कृतींनी ग्रासलेली आहे. महिलांचा आर्थिक, जागतिक, सामाजिक, भावनिक व बौद्धीक विकास व्हायला पाहिजे, महिला ही अबला नसून, शक्तीशाली आहे. आजची महिला ही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. शिक्षणाच्या दृष्टीने तर आजची महिला पुरूषांपेक्षाही पुढे आहे.
डॉ. नितीन तुरस्कर यांनी स्त्री ही संपूर्ण कुटूंबाची जवाबदारी सांभाळते, पण स्वत:च्या आरोग्याकडे ती दुर्लक्ष करते, स्त्रीची उर्जा कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना जास्तीत जास्त खर्च होते. यावेळेस स्त्रीने आपल्या आहाराकडे व आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे यासंबंधी महिलांच्या आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
मृणाल मुनीश्वर यांनी मुला-मुलीत भेदभाव न मानता दोघांनाही समानतेची वागणूक देण्यात यावी, तसेच महिलांना दैनंदिन जीवनात आपल्या भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडताना येणाऱ्या अडचणींचे विविध उदाहरणे व महिलांच्या विविध कायदेविषयाची माहिती दिली.
मनिषा आंबेडारे यांनी महिला व बालकाविषयी विविध उपाययोजनेबाबत माहिती दिली व त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा ्याबाबत अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस स्टेशन कारधा येथे महिलांनी पोलिस स्टेशनचा कारभार सांभाळला. यावेळी कार्यक्रमाला पोलिस मुख्यालयाचे पवार, महिला पोलिस कमर्चारी, सुरक्षा व दक्षता समितीच्या सदस्या, नवप्रविष्ठ महिला पोलिस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संचालन तोडासे यांनी केले. व आभार प्रदर्शन चाफले यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Change the mindset for women's progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.